ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

मुंबई-नाशिक ड्रग्जची राजधानी कशी झाली? गृहमंत्री गप्प का?:संजय राऊतांचा गृहमंत्र्यांना थेट सवाल, शिखर बँकेत सुनेत्रा पवारांसाठी इतरांनाही क्लीन चीट!

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबईसह महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज कुठून येत आहे. मुंबई, नाशिक ड्रग्जची राजधानी का होताना दिसून येत आहे? पुणे, नागपूरमध्ये ड्रग्ज का सापडत आहेत? दरेगावाजवळ ड्रग्जचा कारखाना कुणी सुरू केला? हे महत्त्वाचे प्रश्न आहे, यावर राज्याच्या गृहमंत्र्यांनी बोलले पाहिजे असे
उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, शिखर बँक घोटाळ्यात जर सुनेत्रा पवार यांना क्लीन चीट द्यायची असेल तर इतरांनी द्यावी लागेल म्हणून सर्वांनी क्लीन चीट देण्यात आली आहे. शिवसेना प्रकरणी कोर्ट आज कोणती तारीख देते हे बघावे लागेल. तर अमित शहा हे केवळ निवडणुकीपुरते पश्चिम बंगालमध्ये जातात. आम्ही अनेक वेळा तिथे जात असतो, तिथे काही वाद नाही. तिथली जनता आनंदी आहेत. भाजपने तिथली चिंता करू नये त्यांनी आसामची चिंता करावी. अजित पवारांविषयी भावना व्यक्त करणारी निवडणूक संजय राऊत म्हणाले की, बारामती निवडणूक ही भावनिक आहे. सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पण दुर्दैवाने निवडणूक बिनविरोध झाली नाही. प्रमुख पक्षाचे उमेदवार नसले तरी काही अपक्ष लोकं उभे आहेत. मविआकडून आमच्या नेत्या सुप्रिया सुळे या सांगता सभेला उपस्थित होत्या. शरद पवारांनी सुद्धा सोशल मिडीयाच्या माध्यमातून मतदानासाठी आवाहन केले आहे. सुनेत्रा पवारांनी शरद पवारांचे आशीर्वाद घेतले आहे. अजित पवारांविषयी भावना व्यक्त करणारी ही निवडणूक आहे. राहुरीची निवडणूक सुद्धा महायुती आण्रि मविआमध्ये चांगली टक्कर होताना दिसत आहे. निवडणूक आयोगाच्या ऑफीसवर भाजपचा झेंडा संजय राऊत म्हणाले की, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या सारख्या राज्याच्या निवडणुकीत संविधान आणि लोकशाहीची प्रतिष्ठापणाला लागली आहे. भाजप त्यांचे मंत्री आणि निवडणूक आयोगाने ज्या प्रकारे यंत्रणेचा वापर करत ममता बॅनर्जी यांची कोंडी करण्याचा प्रयत्न चालवला आहे त्याचा धिक्कार करावा तेवढा कमीच आहे. तरीही मला खात्री आहे की पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी चांगल्या बहुमताने सत्तेवर येतील. जनतेच्या हक्काच्या रक्षणासाठी आणि संविधानासाठी ही निवडणूक फार महत्त्वाची असणार आहे. भाजप आणि केंद्र सरकारने पश्चिम बंगालमध्ये यंत्रणेला हाताशी धरत गुंडगिरी सुरू केली आहे. तिथे मतदार कमी आणि पोलिस जास्त झाले आहेत. निवडणूक आयोगाच्या ऑफीसवर मला भाजपचा झेंडा दिसून येत आहे. तिथली जनता भाजपसोबत नाही तर ममता बॅनर्जी सोबत आहे. तर तामिळनाडूमध्ये स्टॅलिन यांची सत्ता येईल. भाजपने खोटं बोलून मोर्चा काढला संजय राऊत म्हणाले की, मुंबईत भाजपने खोटं बोलून मोर्चा काढला, ते महिलांची फसवणूक करत आहेत. महिला आरक्षणाचा कोणताही विषय नसताना त्या नावाने आपण मोर्चा काढत लोकांच्या अडचणी वाढवत आहे. पोलिसांनी गुन्हे दाखल का केले नाही? या मोर्चाला पोलिसांनी लगेच परवानगी का दिली? आम्ही परवानगी मागितल्यावर आम्हाला लगेच परवानगी मिळत नाही.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर