ब्रेकिंग न्यूज
⚡ News18 Marathi Headlines | 16 NOV | 9 AM | Maharashtra Politics | Fadnavis |Shinde | NCP| FDA ✦ ⚡ IND vs PAK : 1 बॉल 3 रन… टीम इंडियाने शेवटच्या बॉलवर नांग्या ठेचल्या; पाकिस्तानच्या पब्लिकचा रस्त्यावर हा… ✦ ⚡ देवदर्शनासाठी गेलं कुटुंब, घरी कोणीही नसल्याची साधली संधी, नाशिकमध्ये 12 लाखांची चोरी ✦ ⚡ मारेगाव तालुक्यात २ कोटी २२ लाखांच्या विकासकामांचा धडाका! ✦ ⚡ मारेगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेत लक्ष्मीपूजन; नवनिर्वाचित संचालिका किरणताई देरकर यांचा सन्मान ✦ ⚡ IND vs NZ 5th ODI : टीम इंडिया 34-3… न्यूझीलंडमध्ये ROKO चा ‘एन्ड गेम’, ज्याची भीती होती तेच झालं! गंभीरन… ✦ ⚡ Pune Amit Shah: पुणेकरांनो लक्ष द्या! अमित शहांच्या दौऱ्यानिमित्त पुढील 2 दिवस वाहतुकीत मोठे बदल, कोणते मार… ✦ ⚡ पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, डाळिंबाच्या बागेत केली वांग्याची शेती, 3 लाख रुपयांचा निव्वळ नफा,… ✦ ⚡ Karad: बँक मॅनेजरने राहत्या प्लॅटमध्ये संपवलं आयुष्य, ‘त्या’ चिठ्ठीनं खळबळ, कराडात काय घडलं? ✦ ⚡ पुण्याहून नागपूरला जाणाऱ्या बसवर काळाचा घाला, थेट पूलावरून खाली कोसळली गाडी, 21 हून अधिक प्रवासी बसमध्ये
SP News Maregaon

IND vs PAK : 1 बॉल 3 रन… टीम इंडियाने शेवटच्या बॉलवर नांग्या ठेचल्या; पाकिस्तानच्या पब्लिकचा रस्त्यावर हा…

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


Final Thriller Over Pakistan Video Viral : अंडर 19 आशिया कपच्या फायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान दरम्यान झालेल्या सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये प्रचंड ड्रामा पाहायला मिळाला. टीम इंडियाला विजयासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 10 रन्सची गरज होती आणि हातामध्ये फक्त 1 विकेट उरली होती. शेवटच्या ओव्हरमध्ये मोहित उल्वाने मैदानात धमाकेदार बटिंग करत शानदार फोर ठोकला, ज्यामुळे भारताचा विजय जवळ आला. एकीकडे सर्वांच्या हृदयाचे ठोके वाढले असताना दुसरीकडे पाकिस्तानमध्ये देखील तणावाचं वातावरण होतं. त्याचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय.
पाकिस्तानी फॅन्सने कडाकडा बोटं मोडली
पाकिस्तानच्या रस्त्यावरचा हा व्हिडीओ असून एका ज्यूसच्या दुकानाबाहेर टीव्ही लावण्यात आली होती. तिथं काही लोकं मॅच बघण्यासाठी जमा झाली. शेवटच्या ओव्हरचा ड्रामा सुरू झाला, तेव्हा पाकिस्तानसाठी लोकं चिअर्स करत होती. शेवटच्या ओव्हरमध्ये विकेट पडावी यासाठी पाकिस्तानी फॅन्स दुआ करत होते. अशातच टीम इंडियाच्या पोरांनी पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्या अन् पाकिस्तानी फॅन्सने डोक्याला हात लावला. इथंही पाकिस्तान हरली म्हणत पाकिस्तानी फॅन्सने कडाकडा बोटं मोडली अन् निघून गेले.

Pakistan fans reaction in the last over. Most satisfying video  https://t.co/8qsulbqFzj
— Sree Harsha (@AapathBandhava) November 15, 2026

मोहित उल्वाने जिंकवली मॅच
शेवटच्या ओव्हरमध्ये दबावाच्या क्षणी पाकिस्तानी बॉलर्सने पुनरागमन करत सलग दोन डॉट बॉल टाकले, ज्यामुळे मैदानावरील तणाव शिगेला पोहोचला होता. मोहित उल्वाने पुन्हा एकदा मोठा शॉट खेळत दोन रन्स काढले अन् पाकिस्तानवर पुन्हा प्रेशर आला. शेवटी 49.6 व्या बॉलवर अहमद हुसेनच्या गोलंदाजीवर मोहित उल्वाने शानदार फोर मारून भारताला अगदी थरारक विजय मिळवून दिला.
शेवटच्या बॉलवर निर्णायक फोर
दरम्यान, पराभवाच्या छायेत असलेल्या टीम इंडियासाठी मनाल चौहान याने 32 बॉलमध्ये 47 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत आशा जिवंत ठेवल्या. त्यानंतर सामनावीर मोहित उल्वा याने मैदानावर चौफेर फटकेबाजी करत अवघ्या 26 बॉलमध्ये नाबाद 49 धावा कुटल्या. मोहितने अखेरच्या विकेटसाठी चिगुरुपती वेंकटा याच्यासोबत नाबाद 30 धावांची भागीदारी केली आणि शेवटच्या बॉलवर निर्णायक फोर मारत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर