ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

पुण्यात सीएनजी अन् पीएनजी पुन्हा महागले:पेट्रोल आणि डिझेल महागणार का? सरकारने दिले स्पष्टीकरण

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे आधीच हैराण झालेल्या पुणेकरांना आता महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. पुण्यात सीएनजी आणि पीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. ‘महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड’ (MNGL) कडून मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू करण्यात आली असून सीएनजीच्या दरात किलोमागे 1 रुपयाची, तर घरगुती पीएनजीच्या दरात 85 पैशांची वाढ झाली आहे. या दरवाढीनंतर पुण्यात आता सीएनजीची किंमत 95.75 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. नैसर्गिक वायूच्या खरेदी खर्चात वाढ झाल्यामुळे ही दरवाढ करावी लागल्याचे सांगण्यात येत आहे. डिझेल आणि एटीएफच्या निर्यात शुल्कात वाढ एकीकडे पुण्यात सीएनजी महागला असतानाच, दुसरीकडे केंद्र सरकारने डिझेल आणि एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (एटीएफ) च्या निर्यातीवरील शुल्कात वाढ केली आहे. सरकारच्या नवीन नियमांनुसार, आता डिझेलच्या निर्यातीवर प्रति लिटर ₹14 आणि एटीएफच्या निर्यातीवर प्रति लिटर ₹12.50 शुल्क आकारले जाईल. देशांतर्गत बाजारात इंधनाचा पुरेसा पुरवठा राखता यावा आणि तेल कंपन्यांच्या अमर्याद निर्यातीवर नियंत्रण ठेवता यावे, यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. दरम्यान, पेट्रोलच्या निर्यात शुल्कात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोल आणि डिझेलही महागणार? सरकारच्या या निर्णयानंतर सर्वसामान्य जनतेमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार का? अशी भीती निर्माण झाली आहे. मात्र, सध्या तरी वाहनधारकांनी घाबरण्याची गरज नाही. देशांतर्गत वापरासाठी विकल्या जाणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलवरील सध्याच्या उत्पादन शुल्कात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या निर्णयाचा थेट परिणाम पेट्रोल पंपावरील किमतींवर होणार नाही. भविष्यात किमती कधी वाढू शकतात? इंधनाच्या किमती केवळ निर्यात शुल्कावर ठरत नाहीत. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती, डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण आणि जागतिक भू-राजकीय तणाव यावर पेट्रोल-डिझेलचे दर अवलंबून असतात. सध्याच्या निर्णयामुळे तात्काळ दरवाढ होणार नसली, तरी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर असेच वाढत राहिल्यास भविष्यात पेट्रोल-डिझेलच्या किमतींवर दबाव वाढून दर वाढू शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कोकरोच जनता पार्टीचा आज नागपुरात एल्गार: जयपूरच्या थप्पड प्रकरणानंतर अभिजीत दिपके मैदानात, फॉलोअर्स घटल्याची चर्चा देशात सध्या गाजत असलेल्या पेपर लीक प्रकरणाचे पडसाद आता नागपुरात उमटणार आहेत. या प्रकरणावरून ‘कोकरोच जनता पार्टी’ आक्रमक झाली असून, आज नागपुरात मोठ्या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी कोकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके आज सकाळीच नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्या उपस्थितीत आज शहरातील संविधान चौकात दुपारी ४ वाजता हे आंदोलन पार पडणार आहे. सविस्तर वाचा

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर