ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

ऐतिहासिक वारसा जपावा:पानगावच्या शिवकालीन अष्टकोनी हत्ती तलाव नूतनीकरण व सुशोभीकरणासाठी निधी द्यावा

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


तालुक्यातील पानगाव येथील ऐतिहासिक शिवकालीन अष्टकोनी हत्ती तलाव हा एक अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक आणि वास्तुकलेचा अद्भूत वारसा आहे. या जलाशयाच्या नूतनीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी येथील पर्यावरण प्रेमी ॲड.प्रशांत शेटे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी अंजली मरोड यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ॲड. प्रशांत शेटे आणि सामाजिक कार्यकर्ते अंकुश वाघमारे यांनी पानगाव येथील ऐतिहासिक शिवकालीन अष्टकोनी हत्ती तलावाच्या सुशोभिकरण व पर्यटन विकासासाठी शासन स्तरावर निधीची उपलब्धता करण्यात यावी याबाबत सकारात्मक चर्चा केली. यावेळी जलाशयाच्या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी शासकीय निधी उपलब्ध करून देण्याची मागणी देखील ॲड.शेटे यांनी केली.हा जलाशय शिवकालीन असल्याने त्याचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता, स्थानिक शेती, पिण्याचे पाणी आणि पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने त्याचे पुनरुज्जीवन आवश्यक असल्याचे यावेळी शेटे यांनी निदर्शनाला आणून दिले. सध्या जलाशय जीर्ण झाल्याने पाणी साठवण क्षमता घटली असून गाळ साचल्याने समस्या निर्माण होत आहे. जलसंपदा विभाग, स्थानिक ग्रामपंचायत आणि इतर संबंधित यंत्रणांच्या समन्वयाने लवकरात लवकर कार्यवाही करण्यावर चर्चा झाली. यावेळी उपजिल्हाधिकारी मरोड यांनी ॲड.शेटे यांनी केलेल्या मागणी बाबत संबंधित विभागांना निर्देश देण्याचे आश्वासन दिले. तलावाची ऐतिहासिक पार्श्वभूमी या तलावाला स्थानिक पातळीवर ”हत्ती तलाव” म्हणून ओळखले जाते, कारण शिवकाळात व मराठा साम्राज्याच्या काळात हत्तींना पोहण्यासाठी आणि पाणी पाजण्यासाठी याची निर्मिती करण्यात आली होती. हा तलाव ३०० बाय ३०० फूट आकाराचा असून पूर्णपणे अष्टकोनी पद्धतीचा आहे. प्राचीन जलव्यवस्थापनाचे हे एक उत्तम उदाहरण मानले जाते. तलावाचे बांधकाम मजबूत दगडी चिऱ्यांमध्ये केलेले असून, आजही त्याची रचना सुस्थितीमध्ये पाहायला मिळते. अनेक दशकांपासून गाळाने आणि झाडीझुडपांनी वेढलेल्या या ऐतिहासिक तलावाला पानगावकर ग्रामस्थांनी एकत्र येत मोठ्या प्रमाणावर श्रमदान करून स्वच्छ केले व पुनरुज्जीवित केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर