ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

‘चिया सीड्स’ला 21 हजार 100 रुपये दर:कमी खर्चात बंपर उत्पादन होताना मंदीमुळे दरात प्रति क्विंटल 3 हजारांची घसरण‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी “चिया सीड्स’ची (काळ्या-पांढऱ्या रंगाचे खाद्य बीज) तब्बल १४६ कट्ट्यांची मोठी आवक झाली. यावेळी चिया सीड्स उत्पादक शेतकऱ्यांना क्विंटलमागे जास्तीत-जास्त २१,१०० रुपये तर कमीत-कमी ८,००० रुपयांचा दर मिळाला. यासोबतच बाजारात २० कट्टे काळे जिरे (शहाजिरे) विक्रीसाठी आले होते, त्यालाही २१,२०० रुपयांपासून १७,१०० रुपयांपर्यंतचा चांगला भाव मिळाला. अकोला बाजार समितीने या सर्व दुर्मिळ व नवीन शेतपिकांच्या विक्रीची हक्काची व्यवस्था केल्यामुळे शेतकऱ्यांना थेट व्यापारी मिळाले आहेत. यामुळे दलालांची मध्यस्थी संपून शेतकऱ्यांच्या थेट खात्यात भरघोस पैसे जमा होत आहेत, जे विदर्भाच्या शेतीसाठी सुबत्तेचे लक्षण आहे. अँटीऑक्सिडंटचा खजिना पारंपरिक कपाशी आणि सोयाबीनचे उत्पन्न घटत असल्याने अकोल्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी आता नगदी व औषधी पिकांचा नवा पर्याय शोधला आहे. ओमेगा-३ फॅटी ॲसिड, फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्सने भरपूर असलेल्या चिया सीड्सची मागणी जगभरात वाढली आहे. काळ्या जिऱ्याचा वापर औषधांमध्ये होत असल्याने बाजारात या पिकांना वर्षभर मागणी असते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर