ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

दाभा येथे बौद्धाचार्य श्रामणेरांचे स्वागत; ग्रामस्थांकडून 2 कि.मी. पर्यंत पुष्पवृष्टी:बुद्ध धम्म मानवतेचा, समतेचा, बंधुत्वाचा मार्गाचा कानमंत्र‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने बडनेरा येथे सुरू असलेल्या बौद्धाचार्य श्रामणेर शिबिरातील श्रामणेरांचे दाभा येथे उत्साहपूर्ण भक्तीमय वातावरणात जंगी स्वागत करण्यात आले. बौद्धाचार्य श्रामणेर संघाला भोजनदान देण्यात आले. गावातील बोद्ध उपासक, उपासिका, नागरिकांनी तब्बल दोन किलोमीटरपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून पुष्पवृष्टी करत श्रामणेरांचे स्वागत केले. संपूर्ण गाव बुद्धमय वातावरणाने भारावून गेले होते. श्रामणेरांच्या स्वागतासाठी गावात विविध ठिकाणी नागरिकांनी स्वागत केले. सबका मंगल, बुद्धं शरणं गच्छामी, जय भीम च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. महिलांनी पारंपरिक पद्धतीने पाय धुवून श्रामणेरांचे स्वागत केले, तर युवकांनी मोटारसायकल रॅली व फटाके उडवून मिरवणुकीत सहभाग घेतला. गावातील मुख्य मार्गांवर ठिकठिकाणी पुष्प, निळे झेंडे आणि पंचशील धम्मध्वजांनी सजावट करण्यात आली होती. ग्रामस्थांनी श्रामणेरांप्रती आदर व्यक्त करत त्यांच्या कार्याला सलाम केला. धम्मप्रसारासाठी घेतलेले श्रम, शिस्तबद्ध जीवनशैली आणि समाजप्रबोधनाचे कार्य पाहून अनेकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी भारतीय बौद्ध महा सभेचे ज्येष्ठ केंद्रीय शिक्षक डॉ. युवराज मोरे यांनी धम्म हा मानवतेचा, समतेचा आणि बंधुत्वाचा मार्ग असल्याचे सांगितले. समाजात वाढत असलेली अंधश्रद्धा, जातीयता आणि अन्याय दूर करण्यासाठी प्रशिक्षित धम्मकार्यकर्त्यांची गरज असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सचालन प्रज्ञा धंदर यांनी कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता भारतीय बोद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष भदंत आनंद (मदन खंडारे), दाभा शाखा अध्यक्ष शिला धंदर, इंदू चक्रे, रंजना टेंभुर्णे, रंजना टेंभुर्णे, सतीश गोपनारायण, मीना ढोके, अस्मिता मोहोड, कमला वानखडे, संबोधी बांबोडे, अर्चना उके आदींनी परिश्रम घेतले. चळवळीला नवसंजीवनी श्रामणेरांनी गावात धम्मदेशनाद्वारे पंचशील, अष्टांगिक मार्ग आणि बुद्धांच्या मानवतावादी विचारांचा संदेश दिला. गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धम्मवंदना व धम्मसभेत सहभाग घेतला. धम्मप्रसाराच्या चळवळीला नवसंजीवनी मिळाल्याचे भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष प्रा. प्रकाश बोरकर यांनी यावेळी प्रतिपादन केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर