ब्रेकिंग न्यूज
⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News
SP News Maregaon

जिल्हाधिकारी यांची अभिनव संकल्पना:प्रथमच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बदल्या, 41 कर्मचारी, 5 मंडळ अधिकारी यांचा समावेश‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


जिल्हा प्रशासनात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या बदल्या यावर्षी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या नेतृत्वात ऑनलाईन समुपदेशनाद्वारे करण्यात आल्या. हा प्रयोग राज्यात पहिल्यांदाच झाला. त्याद्वारे पात्र ४१ कर्मचाऱ्यांपैकी सर्व एक्केचाळीस कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली. मंडळ अधिकारी संवर्गात ५ पात्र कर्मचाऱ्यांपैकी ५ कर्मचाऱ्यांची बदली झाली. ग्राम महसूल अधिकारी संवर्गात ८२ पात्र कर्मचाऱ्यांची बदली झाली. महसूल सहायक संवर्गात ३९ पात्र कर्मचाऱ्यांची बदली झाली. वाहनचालक संवर्गात ३ पात्र कर्मचाऱ्यांची बदली झाली. विशेष म्हणजे बदली करताना जिल्हाधिकारी येरेकर यांनी स्वतः बदलीसाठी पात्र ठरलेल्या कर्मचाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. शंभर टक्के बदल्या समुपदेशनाद्वारे झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाची भावना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या बचतीच्या आव्हानाला प्रतिसाद देत समुपदेशनाद्वारे बदलीचा प्रयोग जिल्ह्यात यशस्वी ठरला आहे. जिल्हाधिकारी यांच्या आस्थापनेवरील प्रशासकीय बदलीस पात्र सहायक महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सहायक व वाहनचालक अशा सर्व संवर्गांच्या प्रशासकीय बदल्या आज दिवसभरात समुपदेशनाद्वारे पार पडल्या. धारणी, वरूड, अंजनगाव सुर्जी, धामणगाव रेल्वे इत्यादी दूरच्या कार्यालयांतून बदली प्रक्रियेसाठी अमरावती मुख्यालयात न येता कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यालयातूनच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रक्रियेत सहभागी होता आले. त्यामुळे बदली प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पडली. प्रक्रिया विक्रमी वेळेत पूर्ण झाली. असा झाला प्रवास केंद्र व राज्य शासनाने सूचित केलेल्या उपाययोजनांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिनस्त जिल्ह्यातील बदलीपात्र कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात न बोलावता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे समुपदेशन बदली प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामुळे सर्व संबंधित कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयातूनच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला. जिल्हाधिकारी यांनीही त्यांच्याशी ऑनलाईनच संपर्क साधला. हा प्रकार पहिल्यांदाच झाला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर