ब्रेकिंग न्यूज
⚡ Pune News: दीर अन् सासूच निघाले ‘व्हिलन’; आधी पतीचं निधन, आता शिक्षिकेला लेकीच्या वाढदिवसादिवशी संपवलं, पुण… ✦ ⚡ रेल्वेत सावज हेरायची, प्रसाद म्हणून चिक्की द्यायची अन्… महिलेचं कांड पाहून सगळ्यांना धक्का, सोलापुरात मोठ… ✦ ⚡ मारेगाव–यवतमाळ महामार्गावर अज्ञात वाहनाची रोह्याला धडक! ✦ ⚡ घोडदरा शिवारात वाघाचे पगमार्क; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! ✦ ⚡ ‘एचआयव्ही’ग्रस्त असल्यानं पत्नी सोडून गेली; पुण्यात चुलत्यानं अल्पवयीन पुतणीवरच केला अत्याचार, जामीन अर्जाव… ✦ ⚡ IND vs NZ : केएल राहुल 5 रनवर असताना मैदानात मोठा ड्रामा… हेन्रीला कॅप्टनने वेड्यात काढलं, पण पुढच्या 2 म… ✦ ⚡ MPSC गट-क परीक्षेसाठी जम्बो भरती, तुम्ही करताय तयारी? अनुभवी विद्यार्थ्यांनी दिले 5 सिक्रेट टिप्स! Video ✦ ⚡ CRIME : ‘आई कुणीतरी मला ब्लॅकमेल करतंय’, हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावरून 20 वर्षाच्या तरुणाचा संशयास्पद मृत… ✦ ⚡ Chandrapur News : चौकात मानवी कवटी, रुळाजवळ छिन्नविच्छिन्न मृतदेह; चंद्रपुरात खळबळ उडवणाऱ्या घटनेबाबत पोलि… ✦ ⚡ Chandrapur News : चौकात मानवी कवटी, रुळाजवळ छिन्नविच्छिन्न मृतदेह; चंद्रपुरात खळबळ उडवणाऱ्या घटनेबाबत पोलि…
SP News Maregaon

चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट!:अभिनेत्री नीलम शिर्के यांची अखेर माघार; राजकीय शिरकावाच्या चर्चांना पूर्णविराम

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


तब्बल 10 वर्षांनंतर पार पडत असलेल्या अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत सध्या मोठा ‘हाय-व्होल्टेज’ ड्रामा पाहायला मिळत आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पत्नी आणि अभिनेत्री नीलम शिर्के यांनी या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महामंडळात राजकीय शिरकाव झाल्याची जोरदार चर्चा रंगली होती. मात्र, या सर्व चर्चांनंतर आता नीलम शिर्के यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी करत या निवडणुकीतून माघार घेण्याचे कारण स्पष्ट केले असून, आपली उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. नीलम शिर्के पत्रात काय म्हणाल्या? नीलम शिर्के म्हणाल्या, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ ही संस्था मराठी चित्रपट आणि त्यासाठी पडद्यावर आणि पडद्यामागे कार्यरत असणाऱ्या सर्व घटकांच्या हितवृद्धीसाठी मागील साठ वर्षापासून कार्यरत आहे. मी स्वतः मराठी नाटके, चित्रपट, मालिका या माध्यमातून गेल्या २५ वर्षापासून रंगभूमीची सेवा करीत आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, बालरंग भूमी परिषद या संस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील सर्व घटकांच्या हितवृद्धीच्या दृष्टीने मी प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून चित्रपट महामंडळाच्या माध्यमातून या क्षेत्रातील कलाकार कामगारांसहित इतर सर्व घटकांच्या हितासाठी कार्य करणाऱ्या या संस्थेसाठी आपण योगदान द्यावे असा विचार मनात होता. नुकतीच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कार्यकारी मंडळाची निवडणुक जाहीर झाली आणि या निवडणूकीच्या प्रक्रियेत प्रमुख भूमिकेत सहभागी असणारे चित्रपट महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष मेघराज राजे भोसले आणि अभिनेते आनंद काळे या दोघांनीही मी या निवडणुकीत उभे राहण्याबद्दल आग्रही विनंती केली. त्यांचा मान राखून सदर निवडणुकीत सहभागी होण्याचे मी ठरवले होते आणि त्या अनुषंगाने लोकशाही प्रक्रियेचा भाग म्हणून मी स्वतः अभिनेत्री या प्रवर्गातून उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे. दरम्यान चित्रपट महामंडळाच्या विद्यमान कार्यकारी मंडळाच्या सदस्य असलेल्या वर्षाताई उसगावकर यावर्षीच्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छुक नसल्याचे मला स्वतः मेघराज राजे भोसले यांनीच कळविले होते, तथापि अभिनेत्री प्रवर्गातून वर्षाताईनी अर्ज दाखल केल्याचे मला माझा उमेदवारी अर्ज भरून झाल्यानंतर सायंकाळी पाच वाजता कळाले, मुळात वर्षाताई यांच्यासारख्या ज्येष्ठ अभिनेत्रीच्या विरोधात निवडणूक लढवून चित्रपट महामंडळाचा राजकीय आखाडा करण्याचा माझा कोणताही हेतू नाही. निवडणूक कार्यक्रमातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत उद्यापासून सुरू होत आहे असे असतानाही प्रसार माध्यमे आणि समाज माध्यमांमधून काही मंडळींनी आरोप प्रत्यारोप आणि इतरांवर चिखल फेक करायला सुरुवात केली आहे, ही बाब मनाला खेद देणारी आणि अत्यंत वेदनादायक आहे. मी कोणत्याही राजकीय पक्षाची प्रतिनिधी किंवा सक्रिय सदस्य नाही तर मी केवळ आणि केवळ रंगभूमीवर श्रद्धा ठेवणारी आणि मागील २५ वर्षापासून रंगभूमीची सेवा करणारी एक महिला कलाकार आहे, याचे देखील भान या विषयाचे राजकारण करणाऱ्यांनी ठेवायला हवे होते असे मी अतिशय नम्रपणे नमूद करू इच्छिते. आज सकाळी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले आणि ज्येष्ठ अभिनेत्री वर्षाताई उसगावकर यांच्यासहित काही जेष्ठ रंगकर्मींशी माझी सविस्तर चर्चा झाली आहे. वर्षाताईसहित चित्रपट आणि नाट्यसृष्टीत कार्यरत असणाऱ्या सर्व ज्येष्ठ सहकाऱ्यांचा सन्मान राखून मी या निवडणुकीत वर्षाताई उसगावकर यांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, त्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रियेचा भाग म्हणून माझा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची कार्यालयीन बाब उद्या पूर्ण करण्यात येईल. राहिला प्रश्न रंगभूमी प्रतीच्या माझ्या योगदानाचा आणि कार्याचा… मी सध्या नाट्य परिषद, बालरंगभूमी परिषद आणि विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर रंगभूमीची आणि दिव्यांग कलाकारांची सेवा करण्याचा प्रयत्न करीत आहेच, यापुढे माझ्या परीने चित्रपट महामंडळासाठी देखील योगदान देत राहील.., तूर्तास एवढेच.. माझी उमेदवारी माघारी घेण्यामुळे कुणाची गैरसोय झाली असल्यास मी व्यक्तिशः दिलगिरी व्यक्त करते, आपणा सर्वांच्या शुभेच्छा आणि पाठिंबासाठी मनःपूर्वक धन्यवाद.., असे नीलम शिर्के यांनी पत्रात म्हटले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर