ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

जनतेसाठी फासावर चढण्याची तयारी:काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांचा भाजपवर घणाघात; निलंबनाच्या कारवाईवर संतापले

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


लोकसभेत झालेल्या गोंधळानंतर निलंबित करण्यात आलेले भंडारा-गोंदियाचे काँग्रेस खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. “निलंबन हा माझ्यासाठी छोटा मुद्दा असून, जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवल्याप्रकरणी मला फासावर चढवलं तरी मी तयार आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपला निर्धार व्यक्त केला. ​लोकसभा अध्यक्षांच्या दिशेने कागद भिरकावल्याचा आणि कामकाजात अडथळा आणल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्रातील डॉ. पडोळे यांच्यासह आठ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. या कारवाईनंतर भंडाऱ्यात पोहोचल्यावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. डॉ. पडोळे म्हणाले की, “सभागृहात भाजपचे नेते अनेकदा ‘अनपार्लमेंटरी’ (असंसदीय) शब्दांचा वापर करतात. त्यांचा रेकॉर्ड तपासावा, मात्र त्यांच्यावर कधीही कारवाई होत नाही. पण जेव्हा आम्ही जनतेचे प्रश्न मांडतो, तेव्हा आमचा आवाज दाबला जातो”. राहुल गांधी यांनी देशाच्या सुरक्षेबाबत उपस्थित केलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याऐवजी सरकार पळ काढत आहे. “सत्य मांडायला सरकार का घाबरते?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. निलंबनामुळे डगमगून न जाता, जनतेच्या हक्कासाठी सभागृहात आणि रस्त्यावरही संघर्ष सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ​सभागृहातील लोकशाहीची गळचेपी आता जनताच उघड्या डोळ्यांनी पाहत असून, विरोधकांचा आवाज दडपण्याचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर