ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

मुलाला उमेदवारी न मिळाल्याने गुलाबराव पाटील नाराज:शायरीच्या माध्यमातून व्यक्त केली खदखद, म्हणाले- ‘नसीब में होगा तो उचलकर आयेगा…’

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


जळगाव विधान परिषदेची जागा भाजपच्या वाट्याला गेल्याने आपल्या मुलाला आमदार करण्याचे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांचे स्वप्न अधुरे राहिले असून, यावरून ते प्रचंड नाराज आहेत. या जागेसाठी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी वारंवार चर्चा करूनही भाजपने ही जागा न सोडल्याने पाटील यांच्या मनातील खदखद कायम आहे. आज पुन्हा एकदा त्यांनी आपल्या खास शैलीत, ‘नसीब में होगा तो उचलकर आयेगा, नही होगा तो…’ अशी शेरोशायरी करत आपल्या मनातील या तीव्र भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. गुलाबराव पाटील म्हणाले, अनेक लोक म्हणतात की तुम्हाला विधानपरिषदेसाठी तिकीट मिळाले नाही. मात्र मी एवढेच सांगतो, ‘नसीब मे होगा तो उचलकर आयेगा और नसीब में नही होगा तो आकर चला जायेगा’, अशी शायरी त्यांनी म्हणून दाखवली. तसेच पुढे म्हणाले की, देवाच्या मनात यापेक्षाही पुढे आयुष्यात काही चांगले होणार असेल. त्यामुळे प्रारब्धावर विश्वास ठेवा. सगळं करा, राजकारण जरूर करा, पण भगवा प्रकाशातील विचार कधी सोडू नका. तुम्ही आमदार केले, मंत्री केले म्हणून मी सामाजिक कार्य करतो आहे. तुमची सेवा करू शकतो आहे, असेही पाटील यांनी म्हटले आहे. मुलाला उमेदवारी मिळावी यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आपल्या मुलाला विधान परिषदेची उमेदवारी मिळावी यासाठी मंत्री गुलाबराव पाटील यांनी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मुंबईत ठाण मांडून एकनाथ शिंदे यांच्या अनेकदा भेटी घेत शर्थीचे प्रयत्न केले. मात्र भाजपने ही जागा सोडण्यास स्पष्ट नकार दिल्याने त्यांच्या पदरी मोठी निराशा आली आहे. शिंदे गटातील या उघड नाराजीचा फटका आगामी निवडणुकीत महायुतीच्या भाजप उमेदवाराला बसण्याची दाट शक्यता वर्तवली जात असून, या अंतर्गत खदखदीचा थेट फायदा विरोधकांच्या पथ्यावर पडणार असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. भाजप उमेदवाराचा अर्ज भरताना गैरहजर आपले चिरंजीव प्रतापराव पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही असलेल्या मंत्री गुलाबराव पाटील यांनी, मुलाला तिकीट न मिळाल्याच्या नाराजीतून जळगावमधील भाजप उमेदवाराचा अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेकडे थेट पाठ फिरवली. विशेष म्हणजे, यावेळी जळगाव जिल्ह्यात उपस्थित असूनही शिवसेनेचे इतर आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनीदेखील अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला गैरहजर राहणे पसंत केल्याने, मित्रपक्ष भाजपवर असलेली शिंदे गटाची ही तीव्र नाराजी आता उघडपणे चव्हाट्यावर आली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर