ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

पिंपरी-चिंचवड महापालिकेत एसीबीची कारवाई:70 हजारांची लाच स्वीकारताना अभियंत्याच्या लाचलुचपत विभागाने आवळल्या मुसक्या

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ड’ प्रभाग क्षेत्रीय कार्यालयातील बीट निरीक्षकाला 70 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे. अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी त्याने ही लाच मागितली होती. उमेश अरुण लोंढे (वय 28, रा. रहाटणी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (वर्ग-3) अधिकाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणात 58 वर्षीय तक्रारदाराने पिंपळे गुरव येथे तीन मजली इमारत बांधली होती. या बांधकामाला महानगरपालिकेची रीतसर परवानगी नव्हती. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने 25 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांना अनधिकृत बांधकामाची नोटीस बजावली होती. या नोटिसीविरोधात तक्रारदारांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने तक्रारदारांना नियमानुसार दंड भरून बांधकाम नियमित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, तक्रारदारांनी महापालिकेकडे बांधकाम नियमितीकरणासाठी अर्ज केला होता. याच दरम्यान, अतिक्रमण विरोधी विभागाचे बीट निरीक्षक उमेश लोंढे यांनी तक्रारदारांशी संपर्क साधला. उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत दाखवूनही लोंढे यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यांनी तक्रारदाराला सांगितले की, “तुमचे बांधकाम पाडावे लागेल. कारवाई टाळायची असेल तर 70 हजार रुपयांची लाच द्यावी लागेल.” तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार नोंदवली. एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता, उमेश लोंढे यांनी पंच समक्ष 70 हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ड’ प्रभाग क्षेत्रीय कार्यालयाच्या पार्किंगमध्ये सापळा रचण्यात आला. उमेश लोंढे यांनी तक्रारदाराकडून 70 हजार रुपयांची लाच स्वीकारताच, एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक अजित पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक अर्जुन भोसले आणि सहायक पोलिस आयुक्त दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश वाळके आणि पोलिस निरीक्षक प्रवीण निंबाळकर यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर