ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

पुण्यात गरीब रुग्णांसाठीच्या हजारो खाटा रिकाम्याच:पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागावर प्रश्नचिन्ह; सक्षम यंत्रणेची मागणी

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुणे शहरात गरीब रुग्णांसाठी राखीव ठेवलेल्या हजारो मोफत खाटा रिकाम्याच राहत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अतिरिक्त एफएसआयच्या बदल्यात खासगी रुग्णालयांना गरीब रुग्णांना मोफत उपचार देणे बंधनकारक असतानाही, पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या उदासीन कारभारामुळे गरजू रुग्ण या सुविधेपासून वंचित राहत असल्याचा आरोप सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केला आहे. शहरातील अनेक मोठ्या खासगी रुग्णालयांना महापालिकेकडून अतिरिक्त एफएसआय (फ्लोर स्पेस इंडेक्स) देण्यात आला आहे. या बदल्यात, या रुग्णालयांनी गरीब रुग्णांसाठी काही खाटा मोफत किंवा अल्पदरात उपचारांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. माहिती अधिकारातून मिळालेल्या आकडेवारीनुसार, या योजनेचा लाभ अत्यंत कमी रुग्णांना मिळत आहे. रुबी हॉल क्लिनिक, सह्याद्री हॉस्पिटल (कर्वे रस्ता) आणि के. के. आय. इन्स्टिट्यूट या तीन रुग्णालयांमध्ये दररोज एकूण 19 खाटा मोफत राखीव ठेवण्याची अट आहे. यानुसार, दरवर्षी सुमारे 6,935 रुग्णांना मोफत उपचार मिळणे अपेक्षित आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांत रुबी हॉलमध्ये केवळ 72, सह्याद्री हॉस्पिटलमध्ये 79 आणि के. के. आय.मध्ये 75 रुग्णांनाच या सुविधेचा लाभ मिळाला आहे. चालू वर्षातही ही संख्या अत्यंत कमी आहे. औंध येथील इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) रुग्णालयातही 10 टक्के खाटा मोफत राखीव ठेवण्याचा करार असून, तिथेही लाभार्थ्यांची संख्या नगण्य असल्याचे उघड झाले आहे. बाणेर येथील पीपीपी तत्वावर उभारण्यात आलेल्या कॅन्सर रुग्णालयाच्या लोकार्पणानंतर हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनीही रुग्णालयांनी नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे आणि कठोर नियमावलीची गरज असल्याचे स्पष्ट केले आहे. योजनेबाबत जनजागृतीचा अभाव आणि लाभार्थ्यांसाठी असलेली वार्षिक 50 हजार रुपयांची अत्यंत कमी उत्पन्न मर्यादा ही देखील मोठी अडचण असल्याचे वेलणकर यांनी नमूद केले. त्यांनी ‘वार्षिक तीन लाखांपर्यंत उत्पन्न असलेली कुटुंबेही महागड्या उपचारांमुळे आर्थिकदृष्ट्या कोलमडतात. त्यामुळे उत्पन्न मर्यादा वाढवून अधिक रुग्णांना या योजनेचा लाभ द्यावा,’ अशी मागणी केली. या पार्श्वभूमीवर, मोफत खाटांचा वर्षभर पूर्ण क्षमतेने वापर होईल अशी सक्षम यंत्रणा उभारणे आणि नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणे अत्यावश्यक आहे. गरीब रुग्णांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर