ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मुलीची लग्नपत्रिका वाटून परताना काळाचा घाला:गिट्टीने भरलेला ट्रक उलटल्याने इंदोरा येथील दोन व्यक्तींचा जागीच मृत्यू

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नियतीचा खेळ किती क्रूर असतो याचा प्रत्यय लाखांदूर तालुक्यातील इंदोरा येथे आला आहे. ज्या घरात काही दिवसांवर मुलीचे लग्न येऊन ठेपले होते, त्याच घराचा आधारस्तंभ काळाने हिरावून नेला. आपल्या लाडक्या मुलीच्या लग्नाची पत्रिका वाटून मित्रासोबत घरी परतणाऱ्या पित्याचा भीषण रस्ते अपघातात जागीच मृत्यू झाला. अर्जुनी मोरगाव जवळील अरूण नगर परिसरात गिट्टीने भरलेला १२ चक्का ट्रक दुचाकीवर उलटल्याने झालेल्या या भीषण अपघातात दोन जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, इंदोरा येथील प्रतिष्ठित नागरिक रमेश सावस्कार (वय ४८) यांच्या मुलीचे लग्न २ एप्रिल रोजी नियोजित आहे. सध्या सर्वत्र लग्नाची लगबग सुरू असून, रमेश सावस्कार हे आपले मित्र अशोक काळबांदे (वय ५२) यांच्यासोबत सासुरवाडी खामखुरा येथे निमंत्रण पत्रिका वाटण्यासाठी गेले होते. १३ मार्च रोजी रात्री ८:३० वाजताच्या सुमारास, पत्रिका वाटप आणि जेवण आटोपून दोघेही दुचाकीने आपल्या गावाकडे परतत होते. दरम्यान अर्जुनी मोरगाव जवळील अरूण नगर परिसरातून जात असताना, समोरून गिट्टीने भरलेला एक १२ चाकी ट्रक भरधाव वेगात येत होता. दरम्यान, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अवजड ट्रक थेट सावस्कार यांच्या दुचाकीवर पलटी झाला. हा अपघात इतका भीषण होता की, ट्रकखाली दबल्या गेल्यामुळे रमेश सावस्कार आणि अशोक काळबांदे या दोघांचाही जागीच चेंदामेंदा होऊन मृत्यू झाला. अपघाताची तीव्रता एवढी मोठी होती की मृतदेहांची ओळख पटवणेही कठीण झाले होते, मात्र अशोक काळबांदे यांच्या खिशातील पाकीटावरून त्यांची ओळख पटली. ​गावावर शोककळा, सर्वत्र हळहळ मृतक रमेश सावस्कार हे इंदोरा येथील ‘कमलाबाई कृषी केंद्रा’चे मालक होते, तर अशोक काळबांदे हे ‘अशोक फोटो स्टुडिओ’ चे मालक होते. व्यवसायानिमित्त या दोन्ही व्यक्तींचा परिसरात मोठा जनसंपर्क होता. ज्या घरात सनई-चौघडे वाजणार होते, तिथे आता शोककळा पसरली असून सावस्कार आणि काळबांदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे संपूर्ण लाखांदूर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर