ब्रेकिंग न्यूज
⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News
SP News Maregaon

पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा त्याग, करारी बाणा अन् दूरदृष्टी अतुलनीय:मुलींनी त्यांच्या कर्तृत्वाचा आदर्श समोर ठेवावा, महापौर ज्योती गाडे यांचे प्रतिपादन‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


प्रतिनिधी | अहिल्यानगर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा करारी बाणा, त्याग, दूरदृष्टी आणि शौर्य हे अतुलनीय होते. मुघलांच्या काळात अनेक हिंदू मंदिरांची पडझड होत असताना त्यांनी देशभरातील मंदिरांचे जतन, पुनर्बांधणी आणि विकास करण्याचे ऐतिहासिक कार्य केले. धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्याबरोबरच त्यांनी समाजकल्याणाला नेहमीच प्राधान्य दिले. शेतकऱ्यांच्या हितासाठी तलावांची निर्मिती, पाणी व्यवस्थापन आणि लोककल्याणकारी कामांच्या माध्यमातून त्यांनी एक आदर्श प्रशासनाचा वस्तुपाठ घालून दिला आहे, असे प्रतिपादन महापौर ज्योती गाडे यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्ह्याला ‘अहिल्यानगर’ हे नवीन नाव मिळाल्यानंतरची ही पहिलीच जयंती असल्याने यंदाचा सोहळा महानगरपालिकेत अधिक उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी महापौर ज्योती गाडे, अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुक्तेकर यांच्यासह मनपाचे विविध अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापौर गाडे म्हणाल्या, अहिल्यादेवींचे कार्य आजच्या युवा पिढीला प्रेरणा, ऊर्जा आणि सकारात्मक दिशा देणारे आहे. विशेषतः मुलींनी त्यांच्या कर्तृत्वाचा आदर्श समोर ठेवून शिक्षण, नेतृत्व आणि सामाजिक कार्याच्या क्षेत्रात पुढे यावे व जीवनात ध्येयवादी वाटचाल करावी. या कार्यक्रमात मनपाच्या सर्वच स्तरांतील अधिकारी, कर्मचारी आणि मान्यवरांनी उपस्थित राहून अहिल्यादेवींच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले. अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुक्तेकर यांनीही जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार, लोकाभिमुख प्रशासन आणि समाजसेवेची प्रेरणा प्रत्येकाने आपल्या दैनंदिन कार्यात आत्मसात करणे गरजेचे आहे. त्यांच्या कार्यातून लोकहित, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठेचा मोलाचा संदेश मिळतो, असे ते म्हणाले. लोकहित, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठेचा मोलाचा संदेश

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर