ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

10 वर्षांच्या नियमामुळे जिल्हा बँकेच्या रिंगणातून दिग्गज बाहेर‎:खासदार भुमरे, माजी मंत्री सत्तार, नितीन पाटील यांना संधी नाही, मुले-पत्नी मैदानात‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी ‎बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. केंद्र‎सरकारच्या नवीन बँकिंग सुधारणा अधिनियम‎२०२५ मुळे जिल्ह्यातील प्रस्थापित राजकारण्यांना‎मोठा धक्का बसला आहे. सलग १० वर्षे संचालक‎पदावर राहिलेल्या नेत्यांना आता निवडणूक‎लढवता येणार नसल्याने या दिग्गजांनी आपल्या‎कुटुंबातील वारसदारांना रिंगणात उतरवण्याची‎तयारी पूर्ण केली आहे.‎
‎
बँकिंग क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी केंद्राने‎सलग २ कार्यकाळ (१० वर्षे) संचालक‎राहिलेल्यांना निवडणूक लढवण्यास बंदी घातली‎आहे. यामुळे खासदार संदिपान भुमरे, आमदार‎अब्दुल सत्तार, काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण पाटील‎डोणगावकर, माजी अध्यक्ष नितीन पाटील, जावेद ‎‎पटेल आणि मंदा अण्णासाहेब माने आदी मातब्बर ‎‎नेत्यांना या वेळेस निवडणुकीपासून वंचित राहावे ‎‎लागणार आहे. दहा वर्षांच्या नियमामुळे मी स्वतः ‎‎रिंगणात नसेल, मात्र माझ्या पत्नीला निवडणुकीत ‎‎उतरवणार आहे. महाविकास आघाडीतील ‎‎घटकपक्षांशी चर्चा करून लवकरच पुढील धोरण ‎‎ठरवू, असे किरण पाटील डोणगावकर यांनी ‎‎सांगितले. नवीन निर्णयामुळे अनेक नवीन‎उमेदवार निवडणुकीत दिसणार आहेत.‎ इनसाइड स्टोरी‎- नेते बाहेर काढणार फॅमिली कार्ड‎ निवडणूक लढवता येणार नसली तरी‎बँकेवरील पकड ढिली होऊ नये यासाठी‎नेत्यांनी ‘फॅमिली कार्ड’ वापरण्यास सुरुवात‎केली आहे. खासदार संदिपान भुमरे १९९७‎पासून बँकेचे संचालक होते. आता त्यांचे पुत्र‎आमदार विलास भुमरे लढणार आहेत.‎खासदार भुमरे यांनी दुजोरा दिला आहे.‎भाजपबरोबर चर्चा करून निवडणूक‎बिनविरोध करण्याचा सेनेचा प्रयत्न अाहे.‎ जूनमध्ये निवडणुकीची‎ शक्यता, तयारीला वेग‎ बँकेची प्रारूप मतदार यादी जाहीर‎झाली असून ६ मेपर्यंत हरकती‎नोंदवता येतील. १८ मेपर्यंत त्यावर‎सुनावणी होईल आणि २१ मे रोजी‎अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली‎जाईल. कोणतीही न्यायालयीन‎अडचण न आल्यास जून‎महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या‎आठवड्यात मतदान होण्याची दाट‎शक्यता वर्तवली जात आहे.‎ भाजपची स्वतंत्र लढण्याची‎ तयारी; महायुतीत पेच?‎ जिल्हा बँकेत पुन्हा एकदा महायुती विरुद्ध‎महाविकास आघाडी असा सामना रंगण्याची‎शक्यता आहे. मात्र, भाजपने या वेळेस‎आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपचे‎शहराध्यक्ष किशोर शितोळे यांनी सांगितले‎की, “मनपा आणि जिल्हा परिषदेनंतर आता‎आमचे लक्ष जिल्हा बँकेवर आहे.‎महायुतीतील पक्षांशी चर्चा करू, पण‎समन्वय न झाल्यास स्वतंत्र लढण्याची‎आमची पूर्ण तयारी आहे.’‎

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर