ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

प्राजक्त तनपुरेंचा भाजपप्रवेश निश्चित? 30 मेची तारीख चर्चेत:विधानपरिषदेची उमेदवारीही ठरणार; जयंत पाटलांचा फोटो डीपीला ठेवला

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी घडामोड घडण्याची चिन्हे दिसत असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तनपुरे यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, 30 मे रोजी प्राजक्त तनपुरे अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. अहिल्यानगर विधानपरिषद मतदारसंघासाठी भाजपकडून प्राजक्त तनपुरे यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच भाजपचे देवळाली प्रवरा नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनीही उमेदवारीची इच्छा जाहीर केली आहे. सत्यजित कदम हे भाजपचे माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे पुत्र आहेत. त्यांनी पक्षनिष्ठेचा मुद्दा पुढे करत, 2009 पासून पक्षाच्या आदेशानुसार आपल्या कुटुंबाने वारंवार माघार घेतल्याचे सांगितले. 2014, 2019 आणि 2024 या निवडणुकांमध्येही पक्षाचा निर्णय मान्य केला असून आता पक्ष निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी देईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. विधानपरिषद निवडणूक ही पसंतीक्रमाच्या मतदान पद्धतीने होत असल्याने भाजपने जर प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी दिली, तर स्थानिक पातळीवर कोणत्या नेत्याला पाठिंबा मिळणार याबाबतही राजकीय चर्चा रंगू लागली आहे. भाजपचे स्थानिक कार्यकर्ते निष्ठावंत उमेदवाराच्या पाठीशी उभे राहणार की तनपुरेंना साथ देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे प्राजक्त तनपुरे गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. राहुरी पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिले यांच्या उमेदवारीवेळी तनपुरेंनी माघार घेतल्यापासून त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत चर्चांना वेग आला होता. जयंत पाटील यांचा फोटो फेसबुक डीपीला ठेवला प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे भाचे असून नगर जिल्ह्यातील प्रभावी नेते म्हणून त्यांची ओळख आहे. भाजप प्रवेशाच्या चर्चांदरम्यान तनपुरेंनी आपल्या फेसबुक प्रोफाइलमध्ये बदल करत जयंत पाटील यांचा फोटो डीपीला ठेवला आहे. त्यामुळे हा भावनिक संदेश देण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. तनपुरे यांच्या संभाव्य पक्षांतरामुळे भाजपची ताकद वाढणार असल्याचे मानले जात असले तरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का ठरू शकतो, असे बोलले जात आहे. भाजपमध्ये जाण्याचा निर्णय जवळपास निश्चित दरम्यान, राहुरी पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानंतर प्राजक्त तनपुरे यांनी केलेल्या वक्तव्याचीही आता पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. तत्त्व आणि निष्ठा जपणाऱ्यांचे राजकारण संपत चालले आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत घड्याळ चिन्हावर लढण्याचा प्रस्ताव आला होता, मात्र तत्त्वांशी तडजोड न करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र आजच्या राजकारणात तत्त्वांशी तडजोड करणाऱ्यांनाच मोठी पदे मिळतात, अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती. त्यांच्या या वक्तव्यांनंतरच तनपुरे यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय जवळपास निश्चित केल्याची चर्चा अधिक तीव्र झाली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर