ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

संभाजीनगरात गुरुवारी पहाटे 5 ते सकाळी 11यादरम्यान वाहतूक बदल लागू:लॉ कॉलेज ते पाणचक्की, मिलिंद चौक ते विद्यापीठ रस्ता ईदनिमित्त गुरुवारी बंद

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शहरात २८ मे रोजी बकरी ईद साजरी होणार आहे. यानिमित्त छावणी येथील ईदगाह मैदानावर नमाज अदा करण्यासाठी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव एकत्र येतात. यादरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून छावणी, रोजाबाग ईदगाह परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. २८ मे रोजी सकाळी ५ वाजेपासून ते ११ वाजेपर्यंत हे वाहतूक बदल लागू राहतील. इदगाह मैदानाजवळील रस्ते बंद असतील. त्याचबरोबर हडको कॉर्नर ते उद्धवराव पाटील चौक या रस्त्याची एक बाजू बंद असेल. या मार्गावरील वाहने शासकीय रुग्णालयाकडील सुरू असलेल्या दुसऱ्या बाजूच्या मार्गाने ये-जा करतील. ही अधिसूचना पोलिस, रुग्णवाहिका व अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना लागू राहणार नाही, असे वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक सचिन मिरघे यांनी सांगितले. गोवंश वाहतूक रोखण्यासाठी शहरात ३ पथके तैनात बंदोबस्तासाठी ४ उपायुक्त, ७ सहायक आयुक्त, २५ निरीक्षक, ५८ एपीआय/पीएसआय, ९८६ अंमलदार, ४९ महिला अंमलदार, ७ कॅमेरामन, राज्य राखीव पोलिस दलाची एक तुकडी, ४०० पुरुष व १०० महिला होमगार्ड असे १६३६ अधिकारी, कर्मचारी तैनात केले आहेत. यासोबतच अवैध गोवंश वाहतूक रोखण्यासाठी शहरात ३ विशेष पथके (१ गुन्हे शाखा, २ परिमंडळ विभाग) स्थापन करण्यात आली असून, ६ ठिकाणी २४ तास चेक पोस्ट असणार आहे. पर्यायी मार्ग : घाटी रुग्णालय व पाणचक्की मार्गे मिलिंद चौकाकडे येणारी वाहने घाटी रुग्णालय, ज्युबिली पार्क, मिलकॉर्नर, बारापुल्ला गेट, मिलिंद चौक या पर्यायी मार्गाने जातील. पर्यायी मार्ग : या मार्गावरील वाहने मिलिंद चौक, बारापुल्ला गेट, मिलकॉर्नर, ज्युबिली पार्क, टाऊन हॉल, मकाई गेट या मार्गाचा वापर करतील.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर