ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

माणिकराव कोकाटेंना जेल की बेल?:हायकोर्टात सुनावणीला सुरुवात, कोर्टात जोरदार युक्तिवाद; सोमवारपर्यंत दिलासा द्यावा- रवींद्र कदम

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून त्यांचे क्रीडा खाते काढून घेण्यात आले असून आता त्यांचा राजीनामा देखील स्वीकारण्यात आला आहे. सध्या माणिकराव कोकाटे यांच्यावर मुंबईच्या लीलावती रुग्णालयात उपचार सुरू असून तूर्तास त्यांची अटक टळली असल्याचे दिसत आहे. कोकाटे यांच्यावर अॅंजिओग्राफी देखील करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. कोर्टात जोरदार युक्तिवाद मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात झाली असून यावेळी दोन्ही पक्षांचा जोरदार युक्तिवाद होत असल्याचे समजते. तसेच कोकाटे यांचे वकील रवींद्र कदम यांनी कोकाटे यांना सोमवार किंवा मंगळवारपर्यंत दिलासा द्यावा, अशी मागणी केली असल्याचे समजते. तर सरकारी वकिलांनी म्हटले की कोकाटे यांना न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी झाला असूनही कोकाटे सरेंडर झाले नसल्याचे म्हटले आहे. ही सुनावणी न्यायमूर्ती लड्डा यांच्यासमोर सुरू आहे. माणिकराव कोकाटे यांच्यावर नाशिक येथील सदनिका गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. तसेच शिक्षेच्या स्थगितीसाठी माणिकराव कोकाटे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी आज सुनावणी होणार आहे. न्यायालयाच्या निर्णयावर माणिकराव कोकाटेंना जेल की बेल ठरणार आहे. तसेच न्यायालयाच्या निर्णयानंतरच कोकाटे यांची आमदारकी रद्द होऊ शकते. त्यांची आमदारकी रद्द करण्यासाठी न्यायालयाने दिलेल्या निकालाची अधिकृत प्रत विधिमंडळ सचिवालयाला मिळणे आवश्यक असणार आहे. कोकाटे यांची बाजू वकील अनिकेत निकम न्यायालयात मांडणार आहेत. आजच्या सुनावणीला याचिकाकर्ते आशुतोष राठोड तसेच अंजली दिघोळे हे देखील उपस्थित असणार आहेत. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी नाशिक पोलिस माणिकराव कोकाटे यांच्या अटकेसाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. परंतु, माणिकराव कोकाटे लीलावती रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याने अद्याप अटक करण्यात आलेली नाही. कोकाटे यांच्यावर अॅंजिओग्राफी करण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टरांनी पोलिसांना दिली आहे. नेमके प्रकरण काय? नाशिकमधील कॅनडा कॉर्नर येथील ‘निर्माण व्ह्यू’ अपार्टमेंटमध्ये 30 वर्षांपूर्वी स्वतःचे उत्पन्न कमी दाखवून मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिका मिळवल्याप्रकरणी आमदार माणिकराव कोकाटे यांना मोठा धक्का बसला आहे. स्वतःसह भाऊ विजय कोकाटे आणि अन्य दोन सहकाऱ्यांच्या मदतीने बेकायदेशीरपणे या सदनिका लाटल्याचा ठपका ठेवत फेब्रुवारी 2025 मध्ये नाशिक जिल्हा न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले होते. या निर्णयाविरोधात कोकाटे यांनी नाशिक सत्र न्यायालयात दाद मागितली होती, मात्र सत्र न्यायालयाने त्यांची ही याचिका फेटाळत जिल्हा न्यायालयाने सुनावलेली शिक्षा कायम ठेवली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर