ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

भाजपने मुंबईसाठी कंबर कसली:परप्रांतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी स्टार प्रचारकांची रणनीती; वाचा कुणावर जबाबदारी?

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


भाजपने मुंबई महापालिकेचा गड जिंकण्यासाठी उत्तर भारतीयांची मने जिंकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यासाठी भाजपने महापालिका निवडणुकीच्या प्रचारात हिंदी भाषिक स्टार प्रचारकांना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आमदार व गायिका मैथिली ठाकूर, मनोज तिवारी यांच्यासह अनेकांचा समावेश असणार आहे. सत्ताधारी महायुतीचा जागावाटपाचा घोळ आता जवळपास संपल्यात जमा आहे. भाजप व शिवसेना ही निवडणूक एकत्रपणे लढणार आहेत. तर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर या निवडणुकांना सामोरा जाणार आहे. भाजप ही निवडणूक जिंकण्यासाठी आकाश – पाताळ एक करत आहे. यासाठी या भगव्या पक्षाकडून वेगवेगळ्या रणनीती आखल्या जात आहेत. यात उत्तर भारतीय मतदारांना पक्षाकडे खेचण्यासाठी त्यांच्याच भागातील स्टार प्रचारकांना प्रचारासाठी बोलावण्याच्या रणनीतीचाही समावेश आहे. कुणाकुणाला प्रचाराच्या मैदानात उतरवणार? यासंबंधीच्या माहितीनुसार, भाजपने उत्तर भारतीयांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आमदार मैथिली ठाकूर, मनोज तिवारी, निरुहुआ व रवी किशन यांना प्रचारासाठी बोलावण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. मतांचे समीकरण पाहता उत्तर भारतीयांची संख्या अधिक असलेल्या वॉर्डांमध्ये भाजपकडून या प्रचारकांना मैदानात उतरवण्यात येईल. त्यामुळे येत्या काही दिवसांत या स्टार प्रचारकांची मांदियाळी मुंबईच्या हिंदी भाषिक बहुल भागात दिसून येईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेनेही या कामी अभिनेता गोविंदा यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. जागांच्या अदलाबदलीवर चर्चा दुसरीकडे, भाजप व शिवसेनेच्या समन्वय समितीची सध्या चर्चा सुरू आहे. त्यात जागांची अदलाबदल, उमेदवारांची देवाणघेवाण व प्रचाराच्या स्ट्रॅटजीवर चर्चा सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हे दोन्ही पक्ष 10-12 जागांवरील उमेदवारांची अदलाबदल करण्याच्या मुद्यावर संवाद साधत आहेत. यापैकी काही जागांवर दोन्ही पक्ष अडून बसलेत. त्यामुळे त्यावर विचारपूर्वक तोडगा काढला जात आहे. मुंबई महापालिकेत महायुतीचाच उमेदवार बसवण्याचा निर्धार शिवसेना व भाजपने केला आहे. त्यामुळे जागांच्या अदलाबदलीच्या प्रक्रियेत कोणताही अडसर येणार नाही याची काळजी दोन्ही पक्षांकडून घेतली जात आहे. मुंबईत निवडणुकीत भाजपच मोठा भाऊ एका वृत्तानुसार भाजप मुंबईत 140, तर शिंदे गट 87 जागांवर लढणार असल्याची माहिती आहे. यामुळे या दोन्ही पक्षांत भाजप मोठा भाऊ राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता केवळ 3 दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांकडून आज रात्री उशिरा किंवा उद्यापासून एबी फॉर्मचे वाटप सुरू केले जाणार असल्याची माहिती आहे. पण सर्वांनी आपापल्या पात्र उमेदवारांना यापूर्वीच कागदपत्रे तयार ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर