ब्रेकिंग न्यूज
⚡ Pandharpur: ‘5 मिनिटं थांबलो असतो तर माझाही जीव…’ विहीर दुर्घटनेतून कसा वाचला 16 वर्षांचा शुभम, सांगितला… ✦ ⚡ दिवाळीला मुलगी घरी आलेली, आईच्या फोनवर व्हिडिओ कॉल, पण संशय बळावला अन् अनर्थ टळला, नाशिकात खळबळ ✦ ⚡ पारंपरिक शेतीची वाट सोडली, बोर लागवडीचा केला यशस्वी प्रयोग, वर्षाला निव्वळ 6 लाख नफा, Video ✦ ⚡ News18 Marathi Headlines | 16 NOV | 9 AM | Maharashtra Politics | Fadnavis |Shinde | NCP| FDA ✦ ⚡ IND vs PAK : 1 बॉल 3 रन… टीम इंडियाने शेवटच्या बॉलवर नांग्या ठेचल्या; पाकिस्तानच्या पब्लिकचा रस्त्यावर हा… ✦ ⚡ देवदर्शनासाठी गेलं कुटुंब, घरी कोणीही नसल्याची साधली संधी, नाशिकमध्ये 12 लाखांची चोरी ✦ ⚡ मारेगाव तालुक्यात २ कोटी २२ लाखांच्या विकासकामांचा धडाका! ✦ ⚡ मारेगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेत लक्ष्मीपूजन; नवनिर्वाचित संचालिका किरणताई देरकर यांचा सन्मान ✦ ⚡ IND vs NZ 5th ODI : टीम इंडिया 34-3… न्यूझीलंडमध्ये ROKO चा ‘एन्ड गेम’, ज्याची भीती होती तेच झालं! गंभीरन… ✦ ⚡ Pune Amit Shah: पुणेकरांनो लक्ष द्या! अमित शहांच्या दौऱ्यानिमित्त पुढील 2 दिवस वाहतुकीत मोठे बदल, कोणते मार…
SP News Maregaon

पुणे-पिंपरी दारूकांडाचे धक्कादायक सत्य समोर:एकूण मृतांची संख्या 22 वर पोहोचली; ऑनलाईन मागवलेल्या मिथेनॉलने कुटुंबे उद्ध्वस्त

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये घडलेल्या विषारी दारू प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.विषारी दारूकांडात मृतांचा आकडा आणखी वाढला असून आता एकूण मृतांची संख्या 22 वर पोहोचली आहे. उरळी कांचन येथील 32 वर्षीय रिक्षाचालक उमेश अवचर याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी त्याने दारू सेवन केल्याची माहिती समोर आली आहे. मृत्यूपूर्वी उमेश अवचर याला दृष्टी कमी होणे, मळमळ, उच्च रक्तदाबाचा त्रास आणि तोंडातून फेस येणे अशी लक्षणे दिसून आली होती. विशेष म्हणजे आरोपी राधेश्याम प्रजापती ज्या परिसरात अवैध दारू तयार करत होता, त्याच भागातील दारूच्या अड्ड्यावरून उमेशने दारू घेतल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे विषारी दारूचे संकट आता पुणे आणि पिंपरी-चिंचवडनंतर उरळी कांचनपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणातील तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. अधिक नफा मिळवण्यासाठी आरोपी योगेश वानखेडे याने दारूमध्ये मिथेनॉल हे घातक रसायन मिसळल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. उरळी कांचन परिसरातील राधेश्याम प्रजापती याच्याकडून योगेश वानखेडे 35 लिटरचा एक कॅन सुमारे 1900 रुपयांना खरेदी करत होता. त्यानंतर ही दारू पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विविध अवैध अड्ड्यांवर सुमारे 2700 रुपये प्रति कॅन दराने विकली जात होती. मात्र अधिक नफा कमावण्यासाठी त्याने ऑनलाईन मागवलेले मिथेनॉल दारूमध्ये मिसळून त्याचे प्रमाण वाढवले. याच घातक मिश्रणामुळे अनेक नागरिकांचा जीव गेल्याचे समोर आले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने या संपूर्ण प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) वर्ग केला आहे. पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त कारवाई करत अवैध दारूच्या नेटवर्कचा शोध सुरू केला आहे. पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवड या भागांमध्ये पसरलेल्या संपूर्ण साखळीचा तपास सुरू असून दारू तयार करणारे, पुरवठा करणारे आणि विक्री करणारे सर्व संबंधित आरोपी तपासाच्या रडारवर आहेत. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली असून त्यापैकी 4 आरोपींना 8 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या दुर्घटनेनंतर पोलिस प्रशासनानेही कठोर भूमिका घेतली आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी दापोडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजय वाघमारे यांना निलंबित केले आहे. तपास पथकाच्या प्रमुखांसह आणखी 4 अधिकाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. दुसरीकडे पुणे शहरात हडपसर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मोगले, सहाय्यक पोलिस निरीक्षक सिकलगर आणि पोलिस उपनिरीक्षक मुलानी यांनाही निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणात निष्काळजीपणा करणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे. संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचे आदेश दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या पोलिस आयुक्तांशी चर्चा करून संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचे आदेश दिले आहेत. विषारी दारू कुठे तयार झाली, त्यामागे कोणते लोक आहेत आणि संपूर्ण साखळी कशी कार्यरत होती याचा शोध घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. आतापर्यंत अनेक आरोपींना अटक झाली असली तरी आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता तपासली जात आहे. गंभीर रुग्णांना वाचवण्यासाठी वैद्यकीय प्रयत्न सुरू असून या मृत्यूकांडातील प्रत्येक दोषीवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी या घटनेला एक प्रकारची हत्या, असल्याचे म्हटले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर