ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

माळशिरस येथे पिकप गाडी विहिरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू:6 गंभीर जखमी; मृतांच्या वारसांना सरकारकडून 5 लाखांची मदत, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सोलापूर येथील माळशिरस येथे पिकअप गाडी विहिरीत कोसळून 8 जणांचा, तर 6 जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. रस्त्याच्या बाजूलाच ही विहीर होती आणि या विहिरीत पिकप गाडी कोसळून यात 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा अपघात घडल्यानंतर आजूबाजूचे लोक जमा झाले असून ही गाडी विहीरीच्या बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. म्हसवड-पंढरपूर मार्गावर तांदुळवाडीजवळ हा भीषण अपघात झाला. या घटेनवर मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच या घटनेतील मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची गोषणा देखील त्यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, माळशिरस तालुक्यातील तांदळवाडी येथे एक वाहन खाजगी शेतातील विहिरीत पडल्याने झालेल्या अपघातात काही भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. सुदैवाने 7 जणांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक दोघेही तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत आणि स्थानिक प्रशासनाशी आम्ही सातत्याने संपर्कात आहोत, अशी माहिती त्यांनी दिली आहे. म्हसवड-पंढरपूर मार्गावरून सिद्धनाथांच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. सिद्धनाथांचं दर्शन करून गावाकडे परताना माळशिरस तालुक्यातील तांदळवाडी गावानजीक एका विहिरीत पिकप गाडी कोसळली. गाडी कोसळून भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मृतांमध्ये महिला, लहान मुलांचा देखील समावेश आहे. सोलापूरच्या पालकमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले की, खूपच दुर्दैवी अशी घटना आहे. मी देखील या संदर्भात माहिती घेत आहे. एवढ्या लोकांचा मृत्यू होत आहे आणि त्यातून अजून गोष्टी स्पष्ट झालेल्या नाहीत. पण आम्ही या संदर्भात माहिती घेत आहोत आणि मदत पोहोचवत आहोत. पुढे बोलताना जयकुमार गोरे म्हणाले, विहीरीची माहिती देखील घेतली जाणार आहे. विहिरीला कठडा आहे की नाही तसेच जर नसेलच तर मग त्यावर कारवाई केली जाईल. रस्त्याच्या बाजूलाच विहीर आहे, तर त्याला कठडा असणे बंधनकारक आहे. पण जर कठडा नसेल तर चौकशी होईल आणि कारवाई होईल. कारवाई करणे हा विषय वेगळा आहे, पण लोकांचा मृत्यू होणे हे अतिशय दुर्दैवी आहे. उत्तम जाणकर काय म्हणाले? माळशिरसचे आमदार उत्तम जाणकार याविषयी बोलताना म्हणाले, माझ्या मतदारसंघात ही घटना घडली आहे. रस्त्याच्या बाजूला ही विहीर आहे. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. मी आता तिथे निघालो आहे. या अपघातात दोन पुरुष वाचले असल्याची माहिती मला मिळत आहे. आमदार राम सातपुते म्हणाले, अतिशय दुःखद घटना आहे. विहीर जी आहे ती पंढरपूरपासून जो रोड आहे, त्याच्या जवळच ही विहीर आहे. विहिरीत थेट गाडी जाऊन पडली आहे. या दुःखद प्रसंगी मी या परिवाराच्या बद्दल सहवेदना व्यक्त करतो. विहीरीच्या कठड्याविषयी मी चौकशी करणार असल्याची माहिती देखील सातपुते यांनी दिली आहे. अशाच पद्धतीची घटना नाशिक येथे देखील घडली होती. नाशिकमध्ये भीषण अपघात:पाण्याने भरलेल्या विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू; इंदोर गावातील एकाच कुटुंबावर काळाचा घाला महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात अत्यंत धक्कादायक अपघात घडला आहे. पाण्याने भरलेल्या विहिरीत कार कोसळल्याने 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना दिंडोरी शहरातील शिवाजीनगर परिसरात घडली. संबंधित कार थेट विहिरीत पडल्याने प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वाचा सविस्तर

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर