ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

वसमतमध्ये क्षुल्लक कारणावरून दोन गटात हाणामारी:5 जण जखमी, परस्पर तक्रारीवरून 29 जणांवर गुन्हा दाखल

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


वसमत येथील शुक्रवारपेठ भागात बैलाचा धक्का लागणे व बैलाच्या पाठीवर हात मारणे या क्षुल्लक कारणावरून झालेला वाद दोन गटातील हाणामारीत झाला. यामध्ये पाच जण जखमी झाले असून त्यांना वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी परस्पर तक्रारीवरून 29 जणांवर शनिवारी ता. 30 पहाटे वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत येथील भट्टीगल्ली भागातील रामा क्षिरसागर हे शुक्रवारी ता. 29 रात्री आठ वाजण्याच्या सुमारास शुक्रवारपेठ भागातून बैल घेऊन जात होते. यावेळी त्यांनी त्या भागातील रस्त्यावरील नागरीकांना बैलाचा धक्का लागेल बाजूला सरका असे सांगितले. तर याचवेळी त्या ठिकाणी असलेल्या सय्यद आसेफ याने बैलाच्या पाठीवर थाप मारली. या कारणावरून दोघांमध्ये वादाला तोंड फुटले. दरम्यान, किरकोळ कारणावरून सुरु झालेल्या वादाचे पर्यावसाण हाणामारीत झाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर दोन्ही गटातील नागरीक समोरा समोर आले. यावेळी शाब्दिक चकमकीनंतर हाणामारी सुरु झाली. लोखंडी रॉडने मारहाण तसेच विटा फेकून मारण्यात आल्या. यामध्ये एका टेम्पोचे कार फुटली तर एका किरणा दुकानाची तोडफोड झाल्याने सुमारे 40 हजार रुपयांचे नुकसान झाले. या घनटेची माहिती मिळताच वसमत शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुधीर वाघ, सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर डेडवाल, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, जमादार गजानन भोपे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या हाणामारीत जखमी झालेल्या पाच जणांना तातडीने उपचारासाठी वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक निलाभ रोहन यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी रामा क्षिरसागर यांच्या तक्रारीवरून सय्यद नासेर, सय्यद आसेफ, सय्यद असद, शाहरूख पठाण, शेख साजीद यांच्यासह 19 जणांवर वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर याच प्रकरणात सय्यद आसेफ यांनी दिलेल्या तक्रारीवरून रामा क्षिरसागर, सोनू क्षिरसागर, प्रभाकर क्षिरसागर, अवी गायकवाड, अमोल क्षिरसागर यांच्यासह 10 जणांवर गुुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक सुधीर वाघ, सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर डेडवाल पुढील तपास करीत आहेत. सध्या वसमत शहरात शांतता असून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नागरीकांनी कुठल्याही अफवांवर विश्‍वास ठेऊ नये असे आवाहन पोलिस विभागाकडून करण्यात आले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर