ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

पार्थ पवारांवर बोलण्यापूर्वी 40 आमदार का गेले ते बघा:उबाठाने विधान परिषदेची निवडणूक लाहोर-रावळपिंडीत लढवावी- नवनाथ बन

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पार्थ पवारांवर टीका करणाऱ्या संजय राऊतांनी लक्ष्यात घ्यावे की आदित्य ठाकरेंच्या कारभाराला कंटाळून तुमच्या पक्षातील 40 आमदार बाहेर पडले. आदित्य ठाकरेंची दादागिरी सर्वांनी पाहिली आहे, मातोश्रीचे दारं आमदारांसाठी कशी बंद होती हे सर्वांना माहिती आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरेंच्या अहंकाराला कंटाळून लोकांनी तुमची साथ सोडली तुम्ही तुमच्या पक्षाकडे बघा इतरांचे पक्ष चालवायला त्या पक्षाचे नेते सक्षम आहे. नवनाथ बन म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरच्या वेळी कारवाई केली म्हणून यांना पोटशूळ उठला होता. कारण त्यांची आणि पाकिस्तानची जवळीक आहे. राऊतांनी ऑपरेशन सिंदूरचे पुरावे मागितले? तुम्ही उबाठाचे प्रवक्ते म्हणून शोभत नाही, तु्म्ही पाकिस्तानचे प्रवक्ते शोभतात. देवाभाऊ गुन्हेगारांना पाठिशी घालत नाही नवनाथ बन म्हणाले की, ज्या पद्धतीने मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी गुन्हेगारांना पाठिशी घातले ते जर पाहिले तर भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे, ही टॅग लाईन उद्धव ठाकरेंची होती. देवेंद्र फडणवीस गुन्हेगारांना पाठिशी घालत नाहीत. कालच जे पोलिस दोषी आहेत त्यांना निलंबित करण्याची हिंमत देवाभाऊ यांनी केली आहे. सचिन वाझे यांचे समर्थन करणाऱ्या उद्धव ठाकरेंना तुम्ही सवाल केला होता का? असा सवाल बन यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवाभाऊ कोणालाही पाठिशी घालत नाहीत. कोणत्या आमदारांचे अवैध दारुचे धंदे? नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत हे गांजा ओढून पत्रकार परिषद घेतात. ते कुठली दारू पिऊन पत्रकार परिषद घेतात याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे. ज्या आमदारांवर राऊतांनी आरोप केले त्याचे पुरावे त्यांनी द्यावे. कोणत्या आमदारांचे अवैध दारु वाल्या आमदारांचे धंदे आहेत हे सांगितले पाहिजे. यांचेच समर्थक अवैध दारुंचा धंदा करतात. 17 जागा आम्हीच जिंकणार नवनाथ बन म्हणाले की, विधान परिषदेच्या 17 जागांवर तुमचे 17 उमेदवार उभे केले तरी काही फरक पडणार नाही. कारण 17 पैकी 17 जागांवर महायुतीचे उमेदवार जिंकतील. ही निवडणूक 17 विरुद्ध 0 असे आम्ही जिंकणार आहोत. तुम्ही लाहोर किंवा रावळपिंडीमध्ये विधान परिषदेची निवडणूक लढवावी त्यांना महाराष्ट्रातील जनतेने नाकारले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर