ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

मरसुळ शिवारात अवैध वाळू वाहतूक:टिप्परसह २० लाखांचा मुद्देमाल जप्त, कुरुंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


बोल्डा ते वाई मार्गावर मरसुळ शिवारात कुरुंदा पोलिसांच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परसह २० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी टिप्पर चालका विरुध्द मंगळवारी ता. २० कुरुंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी टिप्पर चालकास ताब्यात घेतले आहे. हिंगोली जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईची मोहिम हाती घेण्यात आली असून जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी महसूल विभाग तर पोलिस अधिक्षक निलाभ रोहन यांनी पोलिस विभागाची पथके सतर्क केली आहेत. या पथकांना खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनंतर तातडीने कारवाई केली जात आहे. दोन दिवसांपुर्वीच औंढा नागनाथ पोलिसांच्या पथकाने रुपुर शिवारात पूर्णा नदीच्या पात्रातून तीन जेसीबी, तीन ट्रॅक्टर असा ८९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून १६ जणांवर गु्ुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, त्यानंतर बोल्डा ते वाई मार्गावर नांदेड कडून एका टिप्परमध्ये वाळू वाहतूक केली जात असल्याची माहिती अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना यांच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून जमादार संदीप पवार, सतिष नरवाडे, सुमीत टाले, विनोद कुटे यांच्या पथकाने तातडीने बोल्डा ते वाई मार्गावर मरसुळ शिवारात वाहनांची तपासणी सुरु केली. यावेळी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास नांदेडकडून वाळू घेऊन एक टिप्पर येत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी टिप्पर थांबवून चालक सचिन मोरे (रा. शाहुनगर, हडको, नांदेड) याची चौकशी केली. मात्र त्याच्याकडे वाळू वाहतूकीचा परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून पोलिसांनी वाळू व टिप्पर असा २० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी जमादार सतीष नरवाडे यांच्या तक्रारीवरून कुरुंदा पोलिस ठाण्यात टिप्पर चालक सचिन मोरे याच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. जमादार संदीप टाक पुढील तपास करीत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर