ब्रेकिंग न्यूज
लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक IND vs WI : भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची टीम जाहीर! 3 खुंखार खेळाडू घालणार तांडव; 30 वर्षाच्या वादळी खेळाडूचा… घराला एकच दरवाजा, कामे आटोपून झोपली महिला, शेजाऱ्यानं मध्यरात्री पाहिलं, तर…, सांगली हादरलं! गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय केला यशस्वी, आता वर्षाला होतीये 7 लाख रुपयांची उलाढाल, सांगितला यशाचा मंत्र नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO
SP News Maregaon

डी. के. शिवकुमार यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट!:दोघांमध्ये अर्धा तास बंद दाराआड चर्चा, संजय राऊतही होते उपस्थित

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


कर्नाटक विधान परिषद निवडणुकीत भाजपला थेट त्यांच्याच ‘क्रॉस व्होटिंग’च्या खेळात मात देऊन 5 जागा जिंकणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी (20 जून) ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात शिवसेना पुन्हा एकदा पक्षांतराच्या व फुटीच्या चर्चांमुळे गाजत असताना, कर्नाटकच्या या ‘संकटमोचका’ने मातोश्रीवर घेतलेली भेट राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चेत आली आहे. डी. के. शिवकुमार यांचे ठाकरे कुटुंबीयांकडून स्वागत करण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी शाल देऊन त्यांचे आदरातिथ्य केले. या प्रसंगी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतदेखील उपस्थित होते. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली. सद्य राजकीय परिस्थितीवर यावेळी खल झाल्याचे समजते. ‘मातोश्री’वरुन सुळेंच्या लग्न सोहळ्याला उपस्थिती उद्धव ठाकरे यांच्याशी अत्यंत महत्त्वाची चर्चा आटोपल्यानंतर डी. के. शिवकुमार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती यांच्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी रवाना झाले. कर्नाटकात भाजप-जेडीएसला खिंडार कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून धुरा सांभाळल्यानंतर डी. के. शिवकुमार यांनी पहिल्याच निवडणुकीत भाजपला जोरदार झटका दिला आहे. कर्नाटक विधान परिषदेच्या 7 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसने तब्बल 5 जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे, तर विरोधी पक्ष असलेल्या भाजपला केवळ 2 जागांवर समाधान मानावे लागले. 7 जागांसाठी 8 उमेदवार रिंगणात असल्याने लढत चुरशीची मानली जात होती. मात्र, ऐनवेळी भाजप आणि जेडीएस या दोन्ही विरोधी पक्षांच्या आमदारांनी थेट ‘क्रॉस-व्होटिंग’ केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. या अंतर्गत बंडखोरीमुळे काँग्रेसच्या उमेदवारांना अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने जास्त मते मिळाली. हे ही वृत्त वाचा
ज्यांना परत यायचंय त्यांनी यावे, ठाकरेंचे मन मोठे- आदित्य ठाकरे
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या संभाव्य पक्षांतराची चर्चा आणि त्यांच्या वडिलांच्या हत्या प्रकरणाचा सीबीआय कोर्टाचा निकाल, यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेवर, पक्षातील बंडखोर खासदारांवर आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या टीकेवर अत्यंत आक्रमक आणि रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. वाचा सविस्तर

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर