ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

संगमेश्वरमध्ये उभारणार छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक:निधीची कमतरता नाही; काँग्रेसने राजकारण थांबवावे- रामदास कदम

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शिवसेना नेते रामदास कदम यांनी संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारले जाईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी स्मारकाच्या कामावरून उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना कदम आक्रमक झाले. तुमच्या काँग्रेसची सत्ता असताना तुम्ही काय झोपला होता का? तेव्हा तुमचे हात कोणी आखडले होते का? असा थेट सवाल त्यांनी केला. तसेच, सपकाळ यांचा उल्लेख ‘नौटंक्या’ आणि ‘दीड दमडीची किंमत नसलेला माणूस’ असा करत कदम यांनी त्यांचा तीव्र निषेध केला. रामदास कदम म्हणाले की, संगमेश्वरमध्ये स्मारक झाल्यावर दिवगंत अजित पवार हे जिथे आहेत तिथून दोन्ही हाताने आशीर्वाद देतील. काँग्रेसचा कोणीतरी चिंपाट आहे हर्षवर्धन सपकाळ म्हणून येथे येऊन फक्त प्रसिद्धी मिळावी यासाठी वक्तव्य करतात. हे स्मारक होणार कधी अशी विचारणा करत आहेत? अरे गधड्या तुमच्या काँग्रेसची सत्ता असताना तेव्हा काय तुम्ही झोपले होते का? तुमचे काय हात आखडले होते का? त्यावेळी तुमच्याकडे निधी नव्हता का? असा सवाल कदम यांनी केला आहे.

अधिक जागेची आवश्यकता रामदास कदम म्हणाले की, आता छत्रपती संभाजीराजे यांचे स्मारक करण्यासाठी 500 कोटी रुपयांची उपलब्धता तयार झाली आहे, निधी तयार आहे. आपल्याला जागा कमी पडते आहे म्हणून आपले प्रयत्न सुरू आहेत. काही समजून न घेता छत्रपतींच्या नावावर आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न हा नौटंक्या करतो आहे. हे महाराष्ट्राला कळले पाहिजे आणि समजेल सुद्धा. काँग्रेसच्या सपकाळ यांनी जे वक्तव्य केले आहे त्याचा मी निषेध करणे देखील चुकीचे आहे.त्यांना मी दीड दमडीची सुद्धा किंमत देत नाही, असे म्हणत रामदास कदम यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्यावर निशाणा साधला आहे.

नेमके सपकाळ काय म्हणाले? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्मारकाच्या दुरवस्थेवरून महायुती सरकारवर निशाणा साधला होता. ते म्हणाले की, स्मारकाच्या घोषणा अनेकदा झाल्या, पण अंमलबजावणी शून्य आहे. हा सरकारचा ‘करंटेपणा’ असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्मारकाची भीती वाटते का? संभाजी महाराजांच्या स्मारकामुळे मुख्यमंत्र्यांच्या विचारधारेला अडचण येईल, अशी भीती त्यांना वाटतेय का? असा सवाल सपकाळ यांनी केला होता.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर