ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

संभाजीनगरात गोवंश तस्करांच्या टोळीवर थेट ‘मकोका’:मुख्य आरोपीसह 14 जणांवर गुन्हा दाखल, बकरी ईदच्या पूर्वसंध्येला 131 गोवंशांची केली होती सुटका

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात कत्तलीसाठी आणलेल्या १३१ गोवंशांना अमानुष पद्धतीने घराच्या तिसऱ्या मजल्यावर डांबून ठेवले होते. पोलिसांनी धडक कारवाई करत त्या १३१ गोवंशाची सुटका केली होती. दरम्यान, कारवाईच्या तीन दिवसांनंतर जिन्सी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चालणाऱ्या या अवैध गोवंश तस्करी आणि साठवणुकीच्या संपूर्ण रॅकेटविरुद्ध थेट मकोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. गोवंश तस्करी किंवा अवैध कत्तल करणाऱ्या टोळीविरुद्ध मकोका लावण्याची शहरासह मराठवाड्यातील ही पहिलीच ऐतिहासिक कारवाई ठरली आहे. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी या कारवाईला पूर्वपरवानगी दिली आहे. यात टोळी प्रमुख जुबेर शफिक कुरेशी, मोहसीन अय्युब कुरेशी, मोहंमद समीर मोहंमद शरीफ कुरेशी, मुजीब ऊर्फ मुजाहेद अय्युब कुरेशी, शेख कय्युम कुरेशी शेख अयुब कुरेशी, सलीम कुरेशी शेख चांद कुरेशी, वसीम शकील ऊर्फ शफी कुरेशी, काझी कलीम अहमद काझी मोहंमद शरीफ आणि शेख रऊफ शेख युनूस यांच्यासह एकूण १४ आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. दुधाच्या गोठ्याआड उभारला होता कत्तलखाना जिन्सी भागातील रहिवासी असलेले हे आरोपी प्रामुख्याने दुग्ध व्यवसायात होते. पोलिसांची आणि लोकांची नजर चुकवण्यासाठी त्यांनी प्रत्येक गोठ्यात ८ ते १० दुधाळ म्हशी पाळल्या होत्या. मात्र, याच म्हशींच्या आड प्रत्येकी ४ ते ५ गोवंश आणि गायी छुप्या पद्धतीने आणून डांबल्या जात होत्या. याच गोठ्याला लागून अत्यंत गुप्तपणे जनावरांची कत्तल करून मांसाची अवैध विक्री केली जाई. अधिकृत दुग्ध व्यवसायाचा मुखवटा असल्याने कुणालाही त्यांच्या या काळ्या धंद्यांवर संशय येत नव्हता. मकोकात बेकायदा मालमत्ता जप्त मकोका हा संघटित गुन्हेगारीविरुद्धचा कायदा आहे. टोळीवर गेल्या १० वर्षांत किमान २ चार्जशीट असल्यास पोलिस उपमहानिरीक्षक व त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीने हा कायदा लावतात. याचा तपास सहायक पोलिस आयुक्त दर्जाचे अधिकारी करतात. यात आरोपींना जामीन मिळत नाही. आरोपींची बेकायदा मालमत्ता जप्त करून त्यांना शिक्षा होते. गुन्हेगारांची गय केली जाणार नाही गोवंशाची अवैध खरेदी-विक्री किंवा कत्तल करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. मराठवाड्यातील या पहिल्या कारवाईनंतर भविष्यातही अशीच कारवाई करू. नागरिकांनी गोवंशाची अवैध वाहतूक किंवा कत्तलीबाबतची माहिती डायल ११२ किंवा माझ्या ९२२६५१४००१ या क्रमांकावर द्यावी. -प्रवीण पवार, पोलिस आयुक्त. दाट लोकवस्तीत तिसऱ्या मजल्यावर कोंडले होते गोवंश जालना आणि बीड येथून रात्रीच्या अंधारात अतिशय चोरट्या पद्धतीने कंटेनरमधून ही जनावरे शहरात आणली गेली होती. पोलिसांची नजर चुकवण्यासाठी तस्करांनी अत्यंत क्रूर शक्कल लढवली होती. जिन्सी भागातील संजयनगर, बायजीपुरा आणि निजामगंज कॉलनी या दाट लोकवस्तीच्या भागांमधील घरांच्या चक्क तिसऱ्या मजल्यावरील खोल्यांमध्ये आणि टेरेसवर ही जनावरे कोंडून ठेवण्यात आली होती. पंधरा वर्षांचे रेकॉर्ड तपासणार पोलिस आयुक्तांनी केवळ स्थानिक तस्करांवरच नाही, तर या व्यवसायाला आर्थिक रसद पुरवणाऱ्या संपूर्ण साखळीवर लक्ष केंद्रित केले आहे. छत्रपती संभाजीनगर शहर, ग्रामीण, जालना आणि अहिल्यानगर या चार जिल्ह्यांमध्ये मागील १५ वर्षांत गोवंशाची अवैध कत्तल आणि वाहतूक करणाऱ्या सर्व गुन्हेगारांची माहिती संकलित करण्यात आली असून, यापुढे प्रत्येक गुन्ह्याच्या मुळाशी जाऊन कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर