ब्रेकिंग न्यूज
लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक IND vs WI : भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची टीम जाहीर! 3 खुंखार खेळाडू घालणार तांडव; 30 वर्षाच्या वादळी खेळाडूचा… घराला एकच दरवाजा, कामे आटोपून झोपली महिला, शेजाऱ्यानं मध्यरात्री पाहिलं, तर…, सांगली हादरलं! गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय केला यशस्वी, आता वर्षाला होतीये 7 लाख रुपयांची उलाढाल, सांगितला यशाचा मंत्र नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO
SP News Maregaon

नार्वेकर कोण लागून गेला?:वक्तव्याच्या चर्चांना पूर्णविराम; नार्वेकरांशी कोणताही वाद नसल्याचे भास्कर जाधवांचे स्पष्टीकरण

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील अंतर्गत वादाच्या चर्चांना पूर्णविराम देत आमदार भास्कर जाधव यांनी मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट केले आहे. वर्धापन दिन कार्यक्रमादरम्यान “नार्वेकर कोण लागून गेला?” या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादानंतर बोलताना जाधव म्हणाले की, सतत हॉर्न वाजवणारी गाडी राहुल नार्वेकर यांची असल्याचा त्यांचा गैरसमज झाला होता. “माझ्या डोक्यात राहुल नार्वेकर होते. हॉर्नमुळे गोंधळ झाला आणि राहुल नार्वेकर समजून मी ते वक्तव्य केले. मिलिंद नार्वेकर यांच्याशी माझा कोणताही वाद किंवा मतभेद नाही,” असे स्पष्टीकरण भास्कर जाधव यांनी दिले. मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात झालेल्या शिवसेनेच्या 60 व्या वर्धापन दिन कार्यक्रमादरम्यान भास्कर जाधव माध्यमांशी संवाद साधत असताना मिलिंद नार्वेकर यांच्या वाहनाचा हॉर्न वारंवार वाजल्याने जाधव संतापले. “नार्वेकर कोण लागून गेला? ही पद्धत बरोबर नाही. ते आमचे नेते असले म्हणून काय झालं?” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. जाधवांच्या संतापानंतर मिलिंद नार्वेकरांचा टोला यानंतर मिलिंद नार्वेकर यांनी ‘एक्स’वर हा व्हिडिओ शेअर करत उपरोधिक प्रतिक्रिया दिली. “माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, उद्धवजींच्या पत्राची लवकरात लवकर अंमलबजावणी करा; कारण यांच्या मानसिक त्रासाचा फटका आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकांना बसत आहे,” असा टोला त्यांनी लगावला.
पावसाळी अधिवेशनास सुरुवात: विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून शिवरायांना अभिवादन पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. सुरुवातीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून शिवरायांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. दुसरीकडे, विरोधकांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलनाला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे अशा घोषणा दिल्या जात आहेत. वाचा लाइव्ह अपडेट्स

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर