ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

उद्धव ठाकरेंनी भाजपची नव्हे, स्वतःच्या पक्षाची चिंता करावी:चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार, ‘खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच’ असल्याचा पुनरुच्चार

8 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


“उद्धव ठाकरेंनी भाजपची चिंता अजिबात करू नये, त्याऐवजी त्यांनी स्वतःच्या पक्षाकडे बघावे. त्यांचा पक्ष दिवसेंदिवस लहान होत चालला आहे, आधी त्याची काळजी घ्यावी. त्यांचे सर्व लोक त्यांना सोडून दुसऱ्या पक्षात जात आहेत,” अशा शब्दांत भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरेंच्या यवतमाळमधील सभेनंतर बावनकुळेंनी त्यांच्यावर निशाणा साधला. भाजप विचारांसाठी, ठाकरेंचे काम फक्त भडास काढणे! उद्धव ठाकरेंच्या आरोपांना उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, “भाजपने नेहमीच हिंदुत्व आणि राष्ट्रीय अस्मिता मजबूत करण्यासाठी काम केले आहे. आमची पार्टी ही विचारांसाठी काम करते. मात्र, उद्धव ठाकरेंकडे आता बोलण्यासाठी काहीही उरलेले नाही, त्यामुळे सभांमधून फक्त मनातली भडास काढण्याचे काम ते करत आहेत.” बाळासाहेबांची खरी शिवसेना एकनाथ शिंदेंकडे शिवसेनेच्या मालकी हक्कावरून उद्धव ठाकरेंना टोला लगावताना बावनकुळे पुढे म्हणाले की, “वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन आणि त्यांची खरी शिवसेना आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे चालवत आहेत.” ठाकरेंच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळेच ते सातत्याने महायुतीवर टीका करत असल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या फुटीर खासदारांच्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी सभेतून भाजपवर निशाणा साधला आहे. भाजप म्हणजे बाबर जनता पार्टी- उद्धव ठाकरे राम मंदिराच्या मुद्द्यावर भाष्य करताना उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावले. ते म्हणाले, “राम मंदिरासाठी शिवसेनेने मदत केली, चांदीची वीट दिली. आता कळत आहे की ‘मंदिर वही बनायेंगे’ हे कशासाठी होते? तुम्हाला मंदिर बांधायचं नव्हतं, तुम्हाला रामाच्या नावाने लुटालूट करण्याचं दुकान उघडायचं होतं. हिंदू हा बिचारा असाच भोळा आहे, त्याला ‘जय श्रीराम’ म्हटलं की तो विसरून जातो. ही गद्दारी फक्त आपल्याशी झालेली नाही, ही गद्दारी हिंदुत्वाशी झालेली आहे, देशातील नव्हे तर जगातील हिंदूंशी केलेली ही गद्दारी आहे. जशी आता कॉकरोच जनता पार्टी निर्माण झाली आहे, तशी नवीन बीजेपी जन्माला आलेली आहे. ही नवीन बीजेपी कोणती? कारण तेव्हा राम जन्मभूमीवरचं मंदिर बाबराने पाडलं होतं, आता आपण राम मंदिर उभारलं. आता राम मंदिर लुटणारी नवीन बीजेपी आली आहे ती म्हणजे बाबर जनता पार्टी. ही बाबरांची औलाद आहे. त्या बाबराने ते मंदिर पाडलं होतं, ही बाबराची औलाद आता हे राम मंदिर लुटत आहे, मग तुमच्यात आणि त्या बाबरात फरक काय? मग तुम्ही बाबर जनता पार्टीचे आहात का?,” असे म्हणत त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. गडकरींप्रमाणेच फडणवीसांचे पंख कापण्याचे काम सुरू- ठाकरे उद्धव ठाकरे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांचे पंख कापण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कालपरवा ते माझ्यासोबत विमानात बसले होते. पण हतबल होते. कळतच नव्हते हे मुख्यमंत्री आहे. असा काय झाला हा. आत्मविश्वास गमावलेला माणूस. आपले पंख कापतायेत. कापणारे आपलीच माणसे आहेत. हे त्यांना कळतंय. न्याय कुणाकडे मागायचा. कोणते दार ठोठवायचे. ते दार उघडले तरी पंख कापणार. म्हणजे जे काही वाचले ते वाचून जेवढे दिवस आहेत ते ढकललेले बरे. या परिस्थितीत फडणवीस आहे. सरकारने शब्द पाळला नाही, आता जेलभरोचीही तयारी:सरसकट कर्जमाफीसाठी रोहित पवार आज छत्रपती संभाजीनगरात आक्रमक, मोठ्या आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार आज छत्रपती संभाजीनगरात मोठे आंदोलन करणार असून, आंदोलनापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. पंढरपूर आंदोलनावेळी सरकारने दिलेले आश्वासन पाळले नसल्याचा आरोप करत, “सरकारने हा संघर्ष दडपण्याचा प्रयत्न केला तर जेलभरो आंदोलन करू. गरज पडल्यास विदर्भात यापेक्षाही मोठे आंदोलन उभारू,” असा इशारा त्यांनी दिला. सविस्तर वाचा

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर