ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

तळेगाव एमआयडीसीत भीषण दुर्घटना:कार्बन डायऑक्साइड गॅस गळतीने दोन कामगारांचा मृत्यू, 3 कामगार गंभीर जखमी

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मावळ तालुक्यातील तळेगाव एमआयडीसी परिसरातील नवलाख उंबरे येथे असलेल्या शॅफ्लर इंडिया कंपनीत कार्बन डायऑक्साइड गॅस गळतीची धक्कादायक घटना घडली असून, या दुर्घटनेत दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सुरुवातीला या ठिकाणी गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र प्राथमिक तपासाअंती कंपनीमध्ये स्फोट नव्हे, तर कार्बन डायऑक्साइड गॅस गळती झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्दैवी दुर्घटनेत गणेश उंबरे आणि वैभव थोरात या दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच, श्रीकृष्ण साहू, गौरीशंकर शर्मा आणि नरसिंह पाटील हे तीन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. या गंभीर घटनेची माहिती मिळताच कंपनी प्रशासन, एमआयडीसी सुरक्षा यंत्रणा आणि स्थानिक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. सध्या ही गॅस गळती नेमकी कोणत्या कारणामुळे झाली, याचा सविस्तर तपास यंत्रणांकडून सुरू असून परिसरात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे. मात्र, या धक्कादायक दुर्घटनेमुळे संपूर्ण तळेगाव एमआयडीसी परिसरात मोठी खळबळ उडाली असून कामगार वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मनमाड: देवकी हॉस्पिटलमध्ये नवजात बालिकेचा मृत्यू; नातेवाईकांचा डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथील नामांकित देवकी हॉस्पिटलमध्ये प्रसूतीनंतर आयसीयूमध्ये दाखल असलेल्या तीन दिवसांच्या नवजात बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पहाटेपर्यंत बाळाची प्रकृती उत्तम असताना सकाळी अचानक मृत्यू झाल्याचे समजल्याने संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी करत गोंधळ घातला. याप्रकरणी बालिकेचे वडील मोईन तांबोळी यांनी रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांवर उपचारात गंभीर हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला आहे. तसेच, रुग्णालय प्रशासनाने सीसीटीव्ही फुटेज आणि उपचारांची माहिती देण्यास जाणीवपूर्वक विलंब केला असून, प्रकरणाची लपवाछपवी करण्यासाठी वैद्यकीय फाईलमध्ये खाडाखोड केल्याचा गंभीर आरोपही तांबोळी यांनी केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर