ब्रेकिंग न्यूज
पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video Agniveer-Bharti-2026: भावांनो, लागा तयारीला…! कोल्हापुरात 14 सप्टेंबरपासून अग्निवीर भरती, कुणाला संधी? CRIME : रात्री बायकोसोबत ‘आखाड पार्टी’ केली अन् सकाळी शुद्धीत येताच डोक्यात कुकरचं झाकण घालून संपवलं! शिक्ष… Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम…
SP News Maregaon

नाना पटोलेंना साकोलीत मोठा धक्का:नामनिर्देशनापूर्वीच लाखांदूरचे 4 काँग्रेस नगरसेवक भाजपात, ​भंडारा-गोंदियात खळबळबळ

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्रात सध्या 17 जागांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असतानाच, भंडारा-गोंदिया मतदारसंघात काँग्रेसला अत्यंत मोठा आणि अनपेक्षित धक्का बसला आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या साकोली विधानसभा मतदारसंघांतर्गत लाखांदूर नगरपंचायतीच्या तीन विद्यमान नगरसेविका आणि एका स्वीकृत नगरसेवकाने ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला ‘रामराम’ ठोकून भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या अवघ्या एक दिवसा आधी घडलेल्या या राजकीय भूकंपाने काँग्रेस गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.​​ विधानपरीषद आमदार भाजपा नेते डाँ. परीणय फुके व लाखांदूरचे नगराध्यक्ष विनोद ठाकरे यांनी पडद्यामागे आखलेली ‘चाणक्य नीती’ आणि ‘गनिमी कावा’ या पक्षांतरामागे यशस्वी ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. नाना पटोले यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे, तसेच सलग दुसऱ्यांदा काँग्रेसकडून लाखांदूर नगरपंचायतीवर स्वीकृत नगरसेवक म्हणून वर्णी लागलेले मुकेश उर्फ बंटी सहजानी यांनी थेट राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला. या धक्क्यातून काँग्रेस सावरत नाही तोच, दुसऱ्या दिवशी निशा जगदीश बगमारे, लोभाताई बाळू शिलार आणि लता प्रमोद कुडेगावे या तीन महिला नगरसेविकांनीही विधान परिषद आमदार डॉ. परिणय फुके यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश केला.​ अविनाश ब्राह्मणकर विरुद्ध प्रफुल्ल अग्रवाल लढत भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात यावेळची लढत अत्यंत प्रतिष्ठेची आणि चुरशीची मानली जात आहे. महायुतीकडून भाजपने यंदा अविनाश ब्राह्मणकर यांना रिंगणात उतरवले आहे. ब्राह्मणकर यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत साकोली मतदारसंघात नाना पटोले यांना चिवट झुंज दिली होती, जिथे पटोले यांचा केवळ 208 मतांनी निसटता विजय झाला होता. ब्राह्मणकर यांची हीच वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन पक्षाने त्यांना विधान परिषदेची संधी दिली आहे.​ महाविकास आघाडीकडून काँग्रेसने प्रफुल्ल अग्रवाल यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. प्रफुल्ल हे गोंदियाचे माजी काँग्रेस आमदार गोपालदास अग्रवाल यांचे सुपुत्र असून, मागील विधान परिषद निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.​ या मतदारसंघातून यापूर्वी भाजपचे डॉ. परिणय फुके हे विधान परिषद सदस्य होते. हा जिल्हा नाना पटोले यांच्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांचाही बालेकिल्ला मानला जातो. मात्र, मतदान करणाऱ्या स्थानिक लोकप्रतिनिधींमध्येच आता भाजपने खिंडार पाडल्यामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. ​ऐन मतदानाच्या काही दिवस आधी लाखांदूर नगरपंचायतीमधील काँग्रेसचे हे संख्याबळ घटल्यामुळे, त्याचा थेट फटका काँग्रेस उमेदवार प्रफुल्ल अग्रवाल यांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाना पटोलेंच्या स्वतःच्या मतदारसंघात लागलेला हा सुरुंग आगामी निवडणुकीचा निकाल बदलणारा ठरणार का, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर