ब्रेकिंग न्यूज
पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video Agniveer-Bharti-2026: भावांनो, लागा तयारीला…! कोल्हापुरात 14 सप्टेंबरपासून अग्निवीर भरती, कुणाला संधी? CRIME : रात्री बायकोसोबत ‘आखाड पार्टी’ केली अन् सकाळी शुद्धीत येताच डोक्यात कुकरचं झाकण घालून संपवलं! शिक्ष… Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम…
SP News Maregaon

अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या जयंती विशेषांकाचे चौंडी येथे प्रकाशन:लोककल्याणकारी राज्यकारभाराच्या स्मृतींना दिव्य मराठी’ने दिला उजाळा

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


प्रतिनिधी | अहिल्यानगर जामखेड तालुक्यातील चोंडी या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पावन जन्मभूमीत रविवारी भक्ती आणि उत्साहाचा अभूतपूर्व संगम पाहायला मिळाला. अहिल्यादेवी यांच्या ३०१ व्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित मुख्य सोहळ्यात ‘दै. दिव्य मराठी’च्या ‘३०१ वी जयंती विशेषांका’चे भव्य आणि थाटात प्रकाशन करण्यात आले. अथांग जनसमुदायाच्या साक्षीने पार पडलेल्या या सोहळ्यात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्राताई पवार, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, खासदार रामराव वडकुते, कृषीमंत्री दत्ता भरणे, आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री आण्णासाहेब डांगे, आमदार काशिनाथ दाते, तसेच विठ्ठलराव लंघे, उत्तमराव जानकर, अमोल खताळ आणि बाळासाहेब देशमुख आदी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते या विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रकाशन सोहळ्यानंतर उपस्थित सर्वच नेत्यांनी आणि विचारवंतांनी या विशेषांकाचे भरभरून कौतुक केले. लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या न्यायप्रिय, लोककल्याणकारी आणि आदर्श राज्यकारभाराची महती सांगणारा हा अंक वाचकांसाठी माहितीचा खजिना ठरेल, असा सूर यावेळी उमटला. अहिल्यादेवींनी स्थापन केलेला न्याय, धर्म, जनसेवा आणि सुशासनाचा आदर्श या अंकातून अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आला असून, ही पुरवणी म्हणजे त्यांच्या कर्तृत्वाला वाहिलेली एक कृतज्ञतापूर्वक आदरांजलीच आहे, अशा शब्दांत मान्यवरांनी ‘दिव्य मराठी’च्या उपक्रमाचा गौरव केला. या प्रकाशन सोहळ्याला‘दिव्य मराठी’चे स्टेट हेड सुभाष बोंद्रे, युनिट हेड उमाकांत भुसारे, मार्केटिंग एक्झिक्युटिव मनोज गावडे, संतोष लोहारकर आणि संदिप फुंदे या व्यवस्थापकीय सदस्यांची प्रमुख उपस्थिती होती. चोंडीत जमलेल्या लाखो भाविकांनी आणि नागरिकांनीही या विशेषांकाचे स्वागत केले. विशेषांकांचे प्रकाशन करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सभापती प्रा. राम शिंदे, आ. गोपीचंद पडळकर, अण्णसाहेब डांगे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर