ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

मातृशक्ती आयामच्या अभ्यास वर्गात तरूणाईचा संघटीत राहण्याचा संकल्प:अहिल्यादेवी होळकर जन्माेत्सवानिमित्त काढली शाेभायात्रा‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


प्रतिनिधी | अकोला विश्व हिंदू परिषदेच्या विदर्भ प्रांताच्या वतीने मातृशक्ती आयामच्या अभ्यास वर्गाचा समारोप रविवारी झाला. अभ्यास वर्गात विदर्भ प्रांतातील २०० पदाधिकारी महिलांनी सहभाग नोंदवला होता. अभ्यासवर्ग किर्ती नगर परिसरातील जुना आरटीओ कार्यालयानजीकच्या महेश भवन येथे पडला. मातृशक्ती आयमाद्वारे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली. प्रशिक्षण वर्गात विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्र आणि प्रांताच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. संघटनात्मक ध्येय याला लक्षात घेऊन वर्गाचा समारोप करण्यात आला. रविवारी मातृशक्ती आयमाद्वारे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत राष्ट्र आणि संस्कृतीच्या रक्षणाचा संकल्प घेण्यात आला. शिबिराच्या समारोप कार्यक्रमास प्रतिभा बोथारे, गोदावरी बंड, चंद्रप्रकाश लढ्ढा, शिशुगृह अध्यक्षा मीरा जोशी उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वितेसाठी प्रांत सहमंत्री गणेश काळकर, मातृशक्तीच्या प्रांत संयोजिका लीना सोइंदे, दीपाली गंगावणे, अनिता काकड, मीना तडोकार, सीमा दातीर, शिल्पा राजवैद्य, नेहा दुबे, कल्पना पाठक, गोपाल राज्यवैद्य ,संजय दुबे, राजू मंजूळकर, शाम वक्ते, नीलेश पाठक आदींसह विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गा वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. प्रात्यक्षिकांचे सादरीकरण शोभायात्रेत महिलांनी वीरांगणांच्या विविध वेशभूषा धारण केल्या होत्या. या यात्रेत दंड, यष्टी यांची प्रात्यक्षिके सादर केली. ही शोभायात्रा मलकापूर येथील जुन्या ग्रामपंचायत येथून झाली. शोभा यात्रा बसेरा कॉलनी ते गायत्री बालिकाश्रमापर्यंत काढण्यात आली. गायत्री बालिकाश्रम येथे या शोभायात्रेचा समारोप झाला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर