ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

शरद पवारांना सोडून जाऊ नका:शिंदे गटाच्या नेत्याचा शरद पवार गटाच्या नेत्याला सल्ला; प्रशांत जगताप यांनी दिली आहे सोडचिठ्ठी

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मंगळवारी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे शरद पवार गटाला जबर झटका बसल्याचे मानले जात आहे. त्यातच सत्ताधारी शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री रवींद्र धंगेकर यांनी त्यांना शरद पवारांची साथ न सोडण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या या सल्ल्याची स्थानिक राजकारणात खमंग चर्चा रंगली आहे. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने पुण्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही गट या निवडणुकीला एकत्रपणे सामोरे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाशी वाटाघाटी सुरू आहेत. त्याला विरोध म्हणून प्रशांत जगताप यांनी पक्षाच्या प्राथमिक व क्रियाशील सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. या पार्श्वभूमीवर रवींद्र धंगेकर यांनी त्यांना शरद पवारांची साथ न सोडण्याच्या निर्णयावर फेरविचार करण्याचा सल्ला दिला आहे. प्रशांतदादा एक चांगला कार्यकर्ता – रवींद्र धंगेकर रवींद्र धंगेकर गुरुवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले, प्रशांतदादा एक चांगला कार्यकर्ता आहे. त्यांनी पुणे शहरात महापौर पदासह इतर पदांवर चांगले काम केले आहे. कार्यकर्ता एका दिवसात घडत नाही. त्यासाठी अनेक वर्षे जावी लागतात. मी दुसऱ्या पक्षात असलो तरी किंवा विरोधक असलो तरी त्याला सन्मान देण्याचे काम सर्वांनी करायचे असते. प्रशांत जगपात यांनी प्रचंड विचार करून आपला निर्णय घेतला पाहिजे. कारण, एकदा निर्णय घेतल्यानंतर पुन्हा उभे राहण्यासाठी परत अनेक संकटे पार करावी लागतात. यावेळी त्यांना तुम्हाला प्रशांत जगताप यांच्यावर अन्याय झाला असे वाटते का? असा प्रश्न करण्यात आला असता रवींद्र धंगेकर म्हणाले, पक्षप्रमुखांनी आदेश दिल्यानंतर अन्याय बाजूला ठेवावा लागतो. कारण, पक्षप्रमुखांना त्यांच्या पक्षाची व कार्यकर्त्यांची काळजी असते. अजून निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी 30 तारखेपर्यंतची मुदत आहे. त्यांनी अजूनही आपल्या निर्णयावर फेरविचार करावा. राजकारणात आपल्याला आवडत नसले तरी पक्षप्रमुखांच्या पुढे आपण जाता कामा नये. कुठेही गेले तरी पक्षप्रमुखांच्या भूमिका वेगवेगळ्या असतात. प्रशांत जगताप यांची भूमिका योग्य असू शकते, पण पक्ष म्हणून त्यांनी विचार केला पाहिजे. मी त्यांना योग्य तो निर्णय घेण्याचा निरोप पाठवला आहे. प्रशांतदादा पुणेकरांसाठी लढणारा कार्यकर्ता आहे. त्यांनी आपल्या डोक्यात चांगला विचार घ्यावा. तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. पुण्यात अनेक जुनेजाणते राजकारणी लोक आहेत. त्यांनी त्या लोकांशी संवाद साधावा. प्रशांतदादा तसा हुशार आहे. पण कधीकधी चांगल्या माणसासोबतही दगाफटका होतो. त्यामुळे निर्णय घेताना त्यांनी अनेकांशी चर्चा केली पाहिजे, असे धंगेकर म्हणाले. पुण्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे नेमके काय सुरू? पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येण्यावर चर्चा सुरू केली आगहे. यासाठी एक समिती नियुक्त करण्यात आली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून या समितीत माजी खासदार वंदना चव्हाण, प्रवक्ते अंकुश काकडे व स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे यांचा समावेश आहे. या समितीने महापालिका निवडणुकीत अजित पवारांच्या पक्षासोबत युती करण्याची जाहीर भूमिका मांडली होती. त्याला प्रशांत जगताप यांनी कडाडून विरोध केला होता. त्यांनी या प्रकरणी शरद पवारांची भेट घेऊन आपला विरोध दर्शवला आहे. अजित पवारांशी आघाडी केल्यास मी राजकारणातून संन्यास घेईन, असेही ते म्हणाले होते. पण गत काही दिवसांपासून पुण्यात तुतारीचे (शरद पवार गट) उमेदवार घड्याळ (अजित पवार गट) चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगली आहे. याविषयी दोन्ही पक्षांच्या प्रमुखांमध्ये चर्चा झाल्याचेही सांगण्यात येत आहे. यासंबंधीचा निर्णय कोणत्याही क्षणी जाहीर करण्याची चिन्हे असताना प्रशांत जगताप यांनी आपली वेगळी वाट निवडली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर