ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

मुंबई पोलिस दलात खळबळ:तरुण पोलिस शिपायाची गळफास लावून आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये प्रेयसीच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप

5 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबईच्या सांताक्रुझ वाकोला पोलिस कॅम्प परिसरात एका पोलिस शिपायाने प्रेम प्रकरणातून गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कलिना पोलिस मुख्यालयाच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली असून, घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटमधून या आत्महत्येमागचे विदारक कारण उघड झाले आहे. आत्महत्या केलेल्या या पोलिस शिपायाचे नाव भैय्यासाब भीमराव व्हावळे (वय 32) असून ते मूळचे परभणीचे रहिवासी होते. त्यांची 7 फेब्रुवारी 2026 रोजी मुंबई पोलिस दलात चालक पदावर नुकतीच नियुक्ती झाली होती. आपल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी प्रेयसीच्या कुटुंबीयांकडून वारंवार होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे नमूद केले आहे. या घटनेमुळे पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस शिपाई भैय्यासाब व्हावळे यांनी 15 मार्च रोजी कलिना प्रशिक्षण केंद्रात गळफास लावून आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 7 फेब्रुवारी 2026 रोजीच त्यांची पोलिस दलात नियुक्ती झाली होती, मात्र अवघ्या महिनाभरातच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये भैय्यासाब यांनी आपल्या मृत्यूला जबाबदार असलेल्या व्यक्तींची नावे स्पष्टपणे नमूद केली आहेत. नांदेडच्या हदगाव येथील एका तरुणीसोबत त्यांचे प्रेमसंबंध होते, मात्र तिच्या कुटुंबीयांचा या नात्याला तीव्र विरोध होता. तरुणीच्या आई-वडिलांनी भैय्यासाब यांना जीवे मारण्याची आणि नोकरीवरून सस्पेंड करण्याची धमकी देत त्यांचा प्रचंड मानसिक छळ केला होता. तसेच तरुणीचे लग्न दुसरीकडे लावण्याचे ठरवून ‘तू आत्महत्या कर, नाहीतर तुझी नोकरी घालवू’ अशी धमकीही दिल्याचे सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. या सततच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आपले जीवन संपवले असून, याप्रकरणी भैय्यासाब यांच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून वाकोला पोलिसांनी तरुणीच्या आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर