ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

चिखली शिवारात दुचाकीस्वाराकडून गावठी पिस्टलसह 2 जिवंत काडतूस जप्त:परभणीच्या तरुणाला वसमतमध्ये अटक

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


वसमत तालुक्यातील चिखली शिवारात दुचाकीस्वाराच्या तपासणीमध्ये एक गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतूस सापडले असून या प्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. 19 रात्री गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परभणी जिल्हयातील मानवत येथील सुरजितसिंह टाक (26) हा नांदेड येथून दुचाकी वाहनावर परभणीकडे जात असून त्याच्या कपड्याच्या पिशवीमध्ये गावठी पिस्टल व जिवंत काडतूस असल्याची माहिती हट्टा पोलिसांना मिळाली होती. त्यावरून सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव, उपनिरीक्षक शेख, माणिक सिरसेवाड, जमादार किरण, धोतरे, गणेश सुर्यवंशी, संदीप सुरुशे, कृष्णा चव्हाण, हिरामण चव्हाण यांच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी चिखली शिवारात वाहनांची तपासणी सुरु केली होती. यावेळी सायंकाळच्या सुमारास पोलिसांनी एक दुचाकी वाहन थांबविले. यावेळी दुचाकीस्वार सुरजितसिंग याची चौकशी केली असता त्याने सुरवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली त्यानंतर पोलिसांनी त्याच्या जवळील पिशवीची तपासणी केली असता त्यात कपड्यांच्या खालच्या बाजूला एक गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी पिस्टल व काडतूस व दुचाकी वाहन असा सुमारे 70 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक जाधव यांच्या तक्रारीवरून हट्टा पोलिस ठाण्यात सुरजितसिंग टाक (रा. फुलेनगर, मानवत) याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक शेख पुढील तपास करीत आहेत. सुरजितसिंग याने गावठी पिस्टल व काडतूस कोठून खरेदी केले याचा पोलिसांनी तपास चालविला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर