ब्रेकिंग न्यूज
⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News
SP News Maregaon

दैना:भावडी येथे रस्त्याच्या कामाची मुदत संपली, कोट्यवधींचा निधी असूनही रस्ता अपूर्णच; मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची कमालीची अनास्था, मजुरांवर उपासमारीची वेळ‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


प्रतिनिधी | फुलंब्री मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत हाती घेण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामांबाबत प्रशासकीय स्तरावर किती अनास्था आहे, याचे ज्वलंत उदाहरण फुलंब्री तालुक्यातील भावडी येथे पाहायला मिळत आहे. या रस्त्याच्या कामाचा अधिकृत कालावधी संपून गेला असला, तरी प्रत्यक्षात रस्त्याचे काम अद्यापही अपूर्णच आहे. त्यातच आता पावसाळा अगदी तोंडावर आल्याने, या रस्त्याचे काम पूर्ण होणार कधी, असा संतप्त सवाल भावडी येथील ग्रामस्थांना पडला असून, त्यांनी आता थेट आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. सध्या उन्हाळा संपत आला असून पावसाळा तोंडावर आहे. पहिल्याच पावसात या अर्धवट राहिलेल्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होणार आहे. रस्ता अपूर्ण असल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागणार आहे. याचा सर्वाधिक फटका शाळकरी मुले, रुग्ण आणि वृद्ध ग्रामस्थांना बसणार असून एखादी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास गावात रुग्णवाहिका किंवा इतर वाहन येणेही कठीण होईल. सध्या या रस्त्यावर काही ठिकाणी खडी अंथरून ठेवली असल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होऊन आणि कामाची मुदत संपूनही जर रस्ता पूर्ण होत नसेल, तर याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी या रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भावडी येथील संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे. अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आम्ही आधीचे मटेरियल बदलून, त्यांनी पास केलेले नवीन मटेरियल वापरून २०० मीटर काम पूर्ण केले आहे. मात्र, पुढील कामाबाबत कोणतीही सूचना मिळालेली नाही. संबंधित अधिकारी फोन करूनही असे माणिक इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक संतोष बलांडे यांनी सांगितले. असा आहे २.३६ कोटींचा रखडलेला प्रकल्प प्रजिमा ६५ ते भावडी या ३ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून मंजूर झाले होते. या कामाची अंदाजित किंमत २ कोटी ३६ लाख रुपये इतकी आहे. हे काम ११ मार्च २०२४ रोजी सुरू झाले होते, तर नियमानुसार हे काम पूर्ण करण्याची अंतिम तारीख १० मार्च २०२५ पर्यंत होती. मात्र हा कालावधी संपून बराच काळ उलटून गेला तरी काम रखडलेलेच आहे. ठेकेदारामुळे उशीर Ãठेकेदाराने चांगल्या क्वालिटीचे मटेरियल या रस्त्यावर टाकले नव्हते, त्यामुळे या रस्त्याला उशीर झाला आहे. येत्या दोन दिवसांत काम सुरू करण्यात येईल. – रवींद्र वारकरी, उपअभियंता, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर