ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

खा. मोहिते-पाटील बाधित शेतकऱ्यांच्या बांधावर:12 गावांचा कडाडून विरोध, तर समर्थकांचा स्वतंत्र मेळावा, 7 गावांना दिल्या भेटी‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


माळशिरस तालुक्यातील शक्तीपीठ महामार्ग बाधित गावातील शेतकऱ्यांच्या भावना आणि मते जाणून घेण्यासाठी खासदार धैर्यशील मोहिते- पाटील यांनी प्रत्यक्ष गावांना भेटी देत शेतकऱ्यांशी संवाद सुरू केला आहे. माळशिरस तालुक्यातील १२ गावे या महामार्गात बाधित होत असून या बाधित शेतकऱ्यांचा प्रकल्पाला कडाडून विरोध होत आहे, तर दुसरीकडे समर्थकांनीही स्वतंत्र मेळावा घेण्यास सुरुवात केली आहे. अशातच, शेतकऱ्यांना समक्ष भेटून मते जाणून घेण्याचे दिलेले आश्वासन पाळत खासदारांनी गुरुवार दि. २१ मे पासून हा महत्त्वाचा दौरा माळशिरस तालुक्यातून सुरू केला आहे. खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी गुरुवारी वेळापूर, उघडेवाडी, गारवाड, मगरवाडी, चांदापुरी, तरंगफळ आणि निमगाव आदी गावांमध्ये जाऊन तेथील शेतकऱ्यांच्या भावना आणि मते जाणून घेतली. यावेळी आयोजित बैठकांमध्ये बाधित शेतकऱ्यांनी महामार्गामुळे बाधित होणाऱ्या आपल्या सुपीक जमिनी, शेतीचे होणारे मोठे नुकसान, पुनर्वसनाचा प्रश्न, दिला जाणारा मोबदला, तसेच स्थानिकांच्या इतर विविध अडचणींबाबत खासदारांसमोर आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. या दौऱ्यात त्यांच्यासोबत माळशिरस पंचायत समितीचे सभापती दत्ता मगर हे प्रामुख्याने उपस्थित होते. शक्तीपीठ महामार्गाचा हा वाद आता केवळ स्थानिक पातळीवर राहिला नसून त्याला मोठे राजकीय परिमाण लाभले आहे. महामार्ग विरोधी बाधितांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून बळ दिले आहे. माळशिरस तालुक्यातील १२ गावे या प्रकल्पात पूर्णपणे बाधित होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आपल्या अस्तित्वाची लढाई सुरू आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि राजू शेट्टी यांच्या पाठिंब्यामुळे आंदोलकांची ताकद वाढली आहे. आता खासदार धैर्यशील मोहिते- पाटील यांनी स्वतः फिरून गोळा केलेली ही मते आणि शेतकऱ्यांचा हा तीव्र विरोध दिल्ली आणि मुंबईच्या दरबारात कशा प्रकारे मांडला जातो, यावरच शक्तीपीठाचे भवितव्य अवलंबून असणार आहे. महामार्गाचा विषय आणखी तीव्र होणार

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर