ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

गणेश नाईक म्हणजे नवी मुंबईतील मिस्टर फाईव्ह पर्सेंट:त्यांना पाहताच महिला पळून जातात, शिंदे गटाचा वनमंत्री नाईकांवर तिखट हल्ला

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सत्ताधारी शिवसेनेच्या नेत्या शितल म्हात्रे यांनी भाजप नेते तथा मंत्री गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंवर केलेली टीका जोरकसपणे फेटाळून लावली आहे. गणेश नाईक यांचे अस्तित्व फक्त नवी मुंबईपुरते मर्यादित आहे. ते तिथे स्वतः तीनवेळा हरले. त्यांची मुलेही दोनवेळा हरली. त्यानंतर आता स्वतःचे नामोनिशाण मिटू नये म्हणून ते भाजपच्या वळचणीला गेलेलत, असे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणी त्यांनी गणेश नाईकांचा उल्लेख नवी मुंबईचे ‘मिस्टर फाईव्ह पर्सेंट’ म्हणूनही केला. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तिखट हल्ला चढवला होता. भाजपने परवानगी दिली तर मी यांचे नामोनिशाण मिटवून टाकेन. आज पुन्हा मी हे बोलत आहे, असे ते म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर शितल म्हात्रे यांनी त्यांच्यावर तिखट हल्ला चढवला आहे. शितल म्हात्रे म्हणाल्या, गणेश नाईक यांचे अस्तित्व फक्त नवी मुंबईपुरते मर्यादित आहे. तिथे ते स्वतः तीनवेळा हरले. त्यांची मुलेही दोनवेळा हरली. त्यामुळे स्वतःचे नामोनिशाण मिटू नये म्हणून आता ते भाजपच्या वळचणीला गेलेत. गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंवर बोलू नये. आपल्या हाताखाली असलेला एक सर्वसाधारण कार्यकर्ता आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व त्यानंतर उपमुख्यमंत्री होऊन प्रत्येकाच्या गळ्यातील ताईत झाला हे त्यांना बघवत नाही. त्यामुळे त्यांनी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. परंतु त्यांनी हे विसरू नये की, ही थुंकी त्यांच्याच तोंडावर पडणार आहे. गणेश नाईक नवी मुंबईतील मिस्टर फाईव्ह परसेंट

शितल म्हात्रे पुढे म्हणाल्या, गणेश नाईक यांना नवी मुंबईत मिस्टर फाईव्ह परसेंट म्हणून ओळखले जाते. या भागात जे कोणते प्रोजेक्ट सुरू होतात, त्यातील 5 टक्के जोपर्यंत नाईकांना दिले जात नाहीत, तोपर्यंत तो प्रोजेक्ट सुरू होत नाही. असे मी नव्हे तर नवी मुंबईकर म्हणतात. याऊलट एकनाथ शिंदे संपूर्ण महाराष्ट्रात लाडके भाऊ म्हणून बहिणींच्या गळ्यातील ताईत झालेत. ते जिथे जातात तिथे महिलांची त्यांना भेटण्यासाठी गर्दी होते. परंतु गणेश नाईक जिथे जातात तेथून महिला पळून जातात. महिला त्यांच्यापासून दूर जातात. याचे कारण म्हणजे त्यांच्यावर असणारे गंभीर गुन्हे. गणेश नाईकांवर असणाऱ्या गुन्ह्यांची विशेषतः महिलांसंदर्भात असणाऱ्या गुन्ह्यांची माहिती माध्यमांनीच द्यावी. त्यानंतरच ही व्यक्ती काय आहे हे समजेल. आज तुम्ही जे काही बोलत आहात, त्याला आम्हाला अनेक पद्धतीने उत्तर देता येते. पण तुम्ही आमच्या मित्र पक्षाचे नेते असल्यामुळे जास्त बोलत नाही. पण तुम्ही आम्हाला जास्त बोलायला लावू नका. अन्यथा शिवसेनेची महिला आघाडी म्हणजे काय आहे हे आम्ही तुम्हाला दाखवून देऊ. त्यामुळे तुम्ही यापुढे एकनाथ शिंदेंविरोधात गरळ ओकली तर ही महिला आघाडी तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात असू द्या, असे शितल म्हात्रे यांनी म्हटले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर