ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

भागवताच्या माध्यमातून कृष्ण‎कथा सुख-आनंद प्रदान करते‎:पू. राजेशकृष्णजी महाराज, जल्लोषात झाला रुक्मिणी विवाह साेहळा‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


प्रतिनिधी |अकोला कृष्ण भक्ती ही सरळ व सोपी असून, कृष्ण हे निर्व्याज प्रेमाचे प्रतीक आहे. भागवताच्या माध्यमातून कृष्ण कथा या सुख व आनंद प्रदान करून जीवन जगण्याची प्रेरणा देत असल्याचा हितोपदेश वृंदावन निवासी आंतरराष्ट्रीय भागवत कथाकार पू. राजेशकृष्णजी महाराज यांनी केला. ते माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने पुरुषोत्तम मासानिमित्त माहेश्वरी भवन येथे सुरू असलेल्या श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञात मार्गदर्शन करीत होते. पू. राजेशकृष्ण महाराज यांनी रुक्मिणी विवाहाची कथा प्रतिपादित करताना कृष्ण व गोपिकांच्या दैवी प्रेमाची कथा सांगितली. ते म्हणाले प्रेम हे भक्तिमार्गातला महत्त्वाचा टप्पा आहे. भक्त जोपर्यंत प्रेम शिकत नाही; तोपर्यंत तो ज्ञानी होऊ शकत नाही. त्याला भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून सर्वांवर, स्वतःवर, जगण्यावर, मुक्या प्राण्यावर प्रेम करा. यामुळेच भगवंत प्राप्तीचा खरा मार्ग आपणास मिळू शकेल, असेही ते म्हणाले. या कथेत आमदार वसंत खंडेलवाल यांनी सपत्नीक आपली दर्शवून आरतीत सहभाग घेतला. त्यांचे स्वागत समाज ट्रस्ट अध्यक्ष विजय तोष्णीवाल, महिला मंडल अध्यक्ष वंदना हेडा, सचिव शोभा बियाणी, समाज ट्रस्टचे प्रधानमंत्री विजय राठी, नरेश बियाणी, देवानंद लढ्ढा, सीए मनोज चांडक, राजेश लोहीया, प्रा. महेश मुंदडा, प्रा. डॉ. रमण हेडा, पवन बंग, कुंजबिहारी चांडक, गिरीश तोष्णीवाल, प्रदीप राठी, प्रकाश चितलांगे आदींनी केले. या उत्सवात कथेचे मुख्य यजमान मीना टावरी, किशोर लाहोटी, कृष्णा लाहोटी, पोथी यजमान अनुराधा आशीष बाहेती, अनुसया कुंजीलाल जाजू, निधी पंकज कोठारी, आरती यजमान शिला शरद चांडक, रेखा प्रमोद चांडक, मनीषा चेतन चांडक, वंदना विनय मंत्री, दीपा आलोक सारडा यांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली. संचालन महिला मंडळाच्या उपाध्यक्ष आरती जाजू यांनी केले. दुपारी कथास्थळी होम हवन सोहळा मोठ्या भक्तीभावात पार पडले. या कथा उत्सवाचा सर्व महिला पुरुष भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन माहेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्ष वंदना हेडा, सचिव शोभा बियाणी, उपाध्यक्ष मंजू गट्टानी, आरती जाजू, सहसचिव सुनिता हेडा, राधा टावरी, कोषाध्यक्ष अनिता गांधी, सल्लागार हेमा खटोड, शिल्पा चांडक समवेत महिला मंडळाच्या समस्त पदाधिकारी व सदस्यांनी केले. पू. राजेशकृष्णजी महाराज यांनी वृंदावन सोडून प्रदुमन समवेत भगवंत मथुरेला येण्याची सुरस कथा सांगितली. मथुरेला जाताना गोपीकांचा विरह त्यांनी कथन केला. त्याचबरोबर द्वारका प्रसंग ही आपल्या सुरस वाणीतून चितारला. या सत्रात त्यांनी कृष्ण रुक्मिणी विवाहाची सुंदर झाकीयुक्त गाथा, महारास, उद्धव गोपी संवाद आपल्या संगीतमय भजनानी सादर केली. यावेळी माहेश्वरी भवन फुलांनी सजवण्यात आले होते. कृष्ण रुक्मिणीची वरात भवनात काढण्यात आली. या झाकीवर उपस्थित महिला पुरुषांनी पुष्पांची उधळण करीत जल्लोष व नृत्य सादर केले. पंडित वर्गाने रुक्मिणी विवाहात मंत्रोच्चार केला. या झाकीत कृष्ण जयेश टावरी, रुक्मिणी वैभवी, जयेश टावरी बनली. बालकृष्णच्या रुपात मनुश्री बजाज तर फुलांची होळीमधील कृष्ण रुपात राधिका निकुंज हेडा व राधा मेघा रूपेश राठी बनली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर