ब्रेकिंग न्यूज
लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक IND vs WI : भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची टीम जाहीर! 3 खुंखार खेळाडू घालणार तांडव; 30 वर्षाच्या वादळी खेळाडूचा… घराला एकच दरवाजा, कामे आटोपून झोपली महिला, शेजाऱ्यानं मध्यरात्री पाहिलं, तर…, सांगली हादरलं! गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय केला यशस्वी, आता वर्षाला होतीये 7 लाख रुपयांची उलाढाल, सांगितला यशाचा मंत्र नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO
SP News Maregaon

कौंडण्यपूर येथून निघणाऱ्या रुक्मिणी मातेची मानाच्या पालखीचे आज प्रस्थान:400 वर्षांहून जुनी परंपरा, 24 जुलै रोजी होणार पंढरपुरात दाखल‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


विदर्भाची पंढरी आई रुक्मिणी मातेचे माहेर असलेले प्राचीन तीर्थक्षेत्र कौंडण्यपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान येथून दरवर्षी प्रमाणे यंदाही आषाढी पंढरपूर यात्रेकरिता शुक्रवार १९ रोजी पायदळ मानाची पालखी दुपारी ४ वा. प्रस्थान करेल. ही ४०० वर्षांहून जुनी परंपरा असून अजुनही अव्याहतपणे सुरू आहे. ही पालखी २४ जुलै रोजी पंढरपुरात दाखल होईल. त्यानंतर रिंगण, दर्शन झाल्यानंतर परतीच्या प्रवासाला निघेल. १५९४ पासून पंढरपूरला जाणारी महाराष्ट्रातील एकमेव प्रथम पायदळ दिंडी व विदर्भाची एकमेव मानाची पालखी असल्याचे संस्थानाच्या वतीने सांगण्यात आले आहे. निज जेष्ठ शुक्ल पंचमी शुक्रवारी दु. ४ वाजता पालखीचे प्रस्थान होणार आहे. तरी पंचक्रोशीतील वारकरी, भाविक भक्तांनी हजारोच्या संख्येत उपस्थित राहावे, असे आवाहन श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थानाद्वारे करण्यात आले आहे. ही पालखी २४ जुलै रोजी पंढरपुरात दाखल होईल. त्यानंतर रिंगण, दर्शन झाल्यानंतर परतीच्या प्रवासाला निघेल. कुऱ्हा, अमरावती येथे आगमन रुक्मिणी मातेच्या पालखीचे प्रथम कुऱ्हा व नंतर अमरावती येथे आगमन होणार आहे. त्यानंतर पालखी पुढे निघेल. अमरावती येथे रुक्मिणी मातेच्या पालखीचे भव्य स्वागत केले जाणार आहे. या प्रसंगी पालखी, टाळ, मृदंगाचा गजर, फुलांचे उधळण, ढोल-ताशे, फटाक्यांची आतषबाजी, पालखीला खांदा देण्यासाठी भाविकांची गर्दी होणार आहे. या सोहळ्यात सहभागी भाविकांना मोठ्या प्रमाणात प्रसादाचे वितरणही केले जाणार आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर