ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

अमित शहा- धनंजय मुंडे भेटीने राजकीय चर्चांना उधाण:मुंडेंना मंत्री केले तर फडणवीसांना माफ करणार नाही- अंजली दमानिया

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महापालिकेच्या तोंडावर महाराष्ट्रात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. एकीकडे निवडणुकांची तयारी, तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. इतकेच नव्हे, तर यात भर म्हणून आता अजित पवारांच्याच पक्षातील माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी राजधानी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. माणिकराव कोकाटेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची शक्यता असतानाच धनंजय मुंडे यांनी अमित शहा यांची भेट घेणे हा योगायोग नसून मंत्रिपदासाठी सुरू असलेली सेटिंग आहे की काय? असा प्रश्न अनेकांना पडत आहे. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत जोरदार टीका केली आहे. तसेच धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या जन्मी माफ करणार नसल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे. अंजली दमानिया यांनी ट्विट करत म्हटले की, ना खाउंगा ना खाने दुंगा म्हणणाऱ्या पक्षाचे अमित शहा, मला म्हणजे भ्रष्टाचारा विरोधात लढणाऱ्या व्यक्तिला वेळ देत नाहीत, पण अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि आता धनंजय मुंडे यांना भेटण्याची वेळ देतात. यात काय ते समजून जा, असे दमानिया यांनी म्हटले आहे. तसेच भाजपला काय बोलू, शब्दच उरले नाहीत, अशी टीका दमानिया यांनी केली आहे. … तर फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही पुढे अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर असलेल्या आरोपांची थेट यादीच केली आहे. त्या म्हणाल्या, ज्या धनंजय मुंडेंवर 1) बीड बँक घोटाळ्याचे आरोप आहेत, 2) बंदूक राज आणल्याचे आरोप आहेत, 3) महाजेनको मधून राख चोरल्याचे आरोप आहेत, 4) आवादा कंपनीकडून खंडणी मागीतल्याचे आरोप आहेत, 5) कृषी घोटाळ्याचे आरोप आहेत, 6) दहशत, बंदूकराज, गुंडाराज केल्याचे आरोप आहेत आणि सगळ्यात किळसवाणे म्हणजे ज्या क्रूर पद्धतीने स्व. संतोष देशमुख यांची हत्या ज्यांनी करवून घेतली त्या विकृत वाल्मीक कराडची उणीव भासते, असे म्हणणारे धनंजय मुंडे जर परत मंत्री म्हणून परत आले, तर या भाजपचा बहिष्कार लोकांनी केला पाहिजे, असे दमानिया म्हणाल्या. तसेच जर फडणवीसांनी हे होऊ दिले, तर मी या जन्मी त्यांना माफ करणार नाही, असे अंजली दमानिया यांनी स्पष्ट म्हटले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर