ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

बेघरांना घरे न दिल्यास‎शाळा, जिल्हाधिकारी‎कार्यालयात राहणार‎:आ. साजिद खान पठाण यांचा इशारा‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


प्रतिनिधी |अकोला रेल्वे स्थानकाजवळील तार फैल परिसरात सोमवारी सकाळी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. त्यानंतर दुपारी काँग्रेसचे आमदार साजीद खान पठाण यांनी बेघर झालेल्या रहिवाशांना सोबत घेत पत्रकार परिषद घेतली. मान्सूनच्या उंबरठ्यावर कुटुंबे उघड्यावर असून, या कुटुबांच्या पुनर्वसनाविना कारवाई करण्यात आली. त्यामुळे तातडीने निवाऱ्याची व्यवस्था न केल्यास बेघर झालेल्या कुटुंबांना जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, महापालिकेच्या शाळा राहण्यासाठी ताब्यात घ्याव्या लागतील, असे आ. पठाण म्हणाले. याबाबत शुक्रवारी होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेतही मुद्दा उपस्थित करु, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे आगामी काळात पुर्नवसानाचा मुद्दा पेटण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. तारफैल परिसरात गत तीन पिढ्यांपासून वास्तव्यास असलेल्या सुमारे १६५ कुटुंबांवर सोमवारी पहाटे रेल्वे प्रशासनाने अतिक्रमण हटवण्याची कारवाई केल्यानंतर आमदार साजिद खान पठाण यांनी पत्रकार परिषदेत आक्षेप नोंदवला. “पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित असताना करण्यात आलेली ही कारवाई केवळ अन्यायकारकच नव्हे तर अमानवी आहे, असा आरोप केला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर