ब्रेकिंग न्यूज
पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video Agniveer-Bharti-2026: भावांनो, लागा तयारीला…! कोल्हापुरात 14 सप्टेंबरपासून अग्निवीर भरती, कुणाला संधी? CRIME : रात्री बायकोसोबत ‘आखाड पार्टी’ केली अन् सकाळी शुद्धीत येताच डोक्यात कुकरचं झाकण घालून संपवलं! शिक्ष… Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम…
SP News Maregaon

स्वभांडवलावर चालणाऱ्या पोस्टल पतसंस्थेतर्फे पालवे, कुमटकर या भूमीपुत्र अधिकाऱ्यांचा सन्मान:रतीय टपाल सेवेत उल्लेखनीय योगदान

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


प्रतिनिधी |अहिल्यानगर स्वभांडवलावर चालणाऱ्या अहमदनगर डिस्ट्रिक्ट नॅशनल पोस्टल को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीतर्फे जिल्ह्याच्या मातीतून घडलेल्या आणि भारतीय टपाल सेवेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या दोन प्रमुख अधिकाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवून सध्या प्रवर अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले वंजारवाडी (ता. नेवासे) येथील विकास पालवे आणि खातेंतर्गत परीक्षेत यश मिळवून वरिष्ठ पोस्टमास्तर पदाची धुरा सांभाळणारे चोभेवाडी (ता. जामखेड) येथील रहिवासी अमृत कुमटकर यांचा गौरव करण्यात आला. अहिल्यानगर डाक विभागातील दोन्ही प्रमुख अधिकारी हे जिल्ह्याचेच भूमीपुत्र असण्याचा दुर्मीळ योग या निमित्ताने जुळून आल्याचे ज्येष्ठ सभासद संतोष यादव यांनी सांगितले. संस्थेच्या दहाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन हॉटेल राजयोग येथे चेअरमन कमलेश मिरगणे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. मिरगणे म्हणाले, संस्था आजवर स्वभांडवलावर यशस्वीपणे कार्यरत असून उपलब्ध निधीतून कर्जवाटप केले जात आहे. भविष्यात संस्थेला अधिक स्वयंपूर्ण व भांडवलसंपन्न करून सभासदांना आणखी कमी व्याजदरात कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्याचे आमचे नियोजन आहे. या सोहळ्यात राज्यकर निरीक्षक परीक्षेत यश मिळवलेले सौरभ लांडे यांच्यासह उत्कृष्ट कर्मचारी रुपाली खेडकर, असिफ शेख, सुनील रोकडे, शुभांगी मांडगे, संभाजी बसवेकर तसेच निवृत्त सभासद नामदेव डेंगळे, वंदना नगरकर व संजय बोदर्डे आणि ४० गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. प्रवर अधीक्षक विकास पालवे यांनी पतसंस्थेच्या अत्यल्प व्याजदरातील कर्ज सुविधेचे आणि सभासदाभिमुख कार्याचे कौतुक केले. कुमटकर म्हणाले, जन्मभूमीत आणि सहकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेला हा सन्मान अभिमानास्पद आहे. प्रास्ताविक कमलेश मिरगणे यांनी, सूत्रसंचालन मोनाली हिंगे यांनी, तर आभार अमोल साबळे यांनी मानले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर