ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

मित्राच्या वाढदिवसाला न बोलावल्याने तरुणाची आत्महत्या:अखेरच्या स्टेटसमध्ये म्हणाला, ‘माझे दुःख कोणाला सांगू, मी एकटा पडलो’

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मित्रांसोबत झालेल्या वादानंतर तसेच वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला न बोलवल्यामुळे नैराश्यातून एका 24 वर्षीय तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने ‘माझे दुःख कोणाला सांगू, मी एकटा पडलो’ असे स्टेटस ठेवले होते. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ येथील हा तरुण असून त्याचे नाव महेश उद्धव भणगे असे आहे. त्याने राहत्या घरीच विष प्राशन करून हे टोकाचे पाऊल उचलले आहे. जवळच्या मित्राच्या वाढदिवसाला न बोलावल्याने महेश काही दिवसांपासून प्रचंड नैराश्यात होता आणि यातूनच त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. घराच्या छतावर जाऊन केले विष प्राशन मिळालेल्या माहितीनुसार, महेशने पाणी पिण्याच्या तांब्यात विषारी द्रव्य मिसळून प्राशन केले. दुपारच्या वेळी तो एकटाच घरच्या छतावर गेला होता. मात्र, बऱ्याच वेळ झाला तरी तो खाली न आल्याने रात्री 8 च्या सुमारास त्याचे कुटुंबीय त्याला पाहण्यासाठी छतावर गेले. त्यावेळी तो बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ‘माझे दुःख कोणाला सांगू, मी एकटा पडलो’ महेशने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मोबाइलवरून स्टेटस ठेवले होते. त्याने असे लिहिले होते की, ‘माझे दुःख कोणाला सांगू, मी एकटा पडलो’, असे भावनिक स्टेटस त्याने ठेवले होते. दरम्यान, गेल्या सोमवारी (दि. 6 एप्रिल) त्याच्या एका मित्राचा वाढदिवस होता. मेशला यावेळी मित्रांनी बोलावले नाही. त्याला सोडूनच इतर मित्रांनी सेलिब्रेशन केले. या घटनेमुळे महेशला फार वाईट वाटले व यातून तो प्रचंड नैराश्यात गेला व यातून त्याने टोकाचे पाऊल उचलले. या घटनेमुळे कुंबेफळ गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच अंबाजोगाई ग्रामीण पोलिस घटनेचा तपास करत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर