ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

उद्या कार्यकर्त्यांना बोलावून समीर सत्तारांचा अर्ज मागे घ्यायला लावणार:एकनाथ शिंदेंचा आदेश पाळणार! मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर अब्दुल सत्तार बॅकफूटवर

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सत्ता यावी यासाठी महायुतीच्या तिन्ही पक्षांनी मेहनत घेतली. पण सत्ता आल्यावर एकच पक्ष आपला पक्ष वाढवत असेल तर दुसरा पक्ष संपवत असेल तर ही संपूर्ण माहिती आम्ही आमच्या नेत्यांना दिली. ही माहिती दिल्यावर आमच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भाजपचे नेते जी वागणूक आम्हाला देऊ लागले आहे ती सत्ताधारी नाही तर विरोधकांपेक्षाही वाईट देत आहे, यावर आम्ही आमच्या नेत्यांकडे भावना व्यक्त केल्या, असे शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे. अब्दुल सत्तार म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर-जालना विधान परिषद निवडणुकीसंदर्भात माझे आणि मुख्यमंत्र्यांचे फोनवर बोलणं झाले आहे त्यांनी सांगितले की उमेदवारी अर्ज मागे घ्या. उद्या मी कार्यकर्त्यांनी बोलावून घेत अर्ज मागे घ्यायला लावणार आहे. यासाठी मला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली. पण कार्यकर्त्यांना विश्वासात घेत उमेदवारी मागे घेतली तर नाराजीचा सुर राहत नाही. पक्षाचे नुकसान होऊ नये अब्दुल सत्तार म्हणाले की, आमचा पक्ष संपू नये, पक्षाचे नुकसान होऊ नये ही आमची भावना आहे. कोणी मला पाठिंबा द्यावा असा माझा काही उद्देश नाही. बाळासाहेब ठाकरे यांचा बालेकिल्ला म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे. आता जिल्ह्यातील संपूर्ण सत्ता आमचा मित्रपक्षच हिसकावून घेत आहे. काम करायला अडचण येत असेल तर त्यावर आम्हाला बोलावे लागेल. राज्यातील नाही तर स्थानिक नेत्यांवर आमचा रोष आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोघे यावर चर्चा करतील. या बैठकीनंतर अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले की, ही लढाई केवळ आमच्या जिल्ह्यापुरती आहे. राज्यात तसे काही नाही. स्थानिक पातळीवर काही मतभेद असले तरी राज्यात आणि देशात आम्ही भाजपसोबत खंबीरपणे उभे आहोत. राज्यात भाजप हा मोठा भाऊ तर राष्ट्रवादी काँग्रेस छोट्या भावाच्या भूमिकेत असून, आमच्यामुळे महायुतीला कोणताही तडा जाणार नाही. या वादावर पुढील तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली जाणार आहे. अंबादास दानवेंच्या भेटीवर बोलताना त्यांनी ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे सांगत, आपले नेते एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आपल्याला अंतिम आणि मान्य असेल, अशी मवाळ भूमिका घेतली आहे. आमच्यामुळे युतीला तडा जाणार नाही अब्दुल सत्तार म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमचे नेते आहेत ते जे सांगतील ते जे बोलतील तो निर्णय अंतिम राहील. आमच्यामुळे राज्यातील युतीला कुठेही तडा जाणार नाही याची आम्ही दक्षता घेणार नाही. छत्रपती संभाजीनगरचे 6 आमदार आणि 1 खासदार यांची जवळपास साडेतीन तास शिंदेंसोबत बैठक झाली. दोन दिवसात काय ते स्पष्ट होईल. राज्यात भाजपच मोठा भाऊ अंबादास दानवे यांच्या भेटीवर बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले की, आम्ही मुस्लिम असल्याने सर्वांना गळाभेट घेऊन भेटतो. मात्र जो काही निर्णय असेल तो एकनाथ शिंदेच घेणार. आम्ही जिल्ह्यापुरते मर्यादित कार्यकर्ते आहोत. हा विषय राज्याचा नाही. राज्यात भाजपच मोठा भाऊ आहे. आम्ही छोटे आहोत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर