ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

राऊत आज पवारांविरोधात, उद्या उद्धव ठाकरेंविरोधातही बोलतील:राज्यसभेसाठी काँग्रेसची सुपारी घेऊन उबाठा संपवण्याचं काम- नवनाथ बन

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


संजय राऊत हे राहुल गांधींची चाकरी करत असून पक्ष संपवण्याचं षडयंत्र रचत आहे. भविष्यात उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन होईल, असा दावा भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. तर मातोश्रीचे दरवाजे बंद असल्यामुळे खासदारांना दुसरीकडे जावे लागते. भविष्यात जनता देखील उबाठा गटासाठी दरवाजे बंद करेल असेही त्यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत यांनी आम्ही शरद पवार यांच्या वक्तव्याशी सहमत नाही असे वक्तव्य केले. उद्या हेच संजय राऊत आदित्य ठाकरेंच्या मताशी सहमत नाही आणि उद्धव ठाकरेंच्या भूमिकेशी सहमत नाही असे सांगायला कमी करणार नाही. सातत्याने राहुल गांधी यांची चाकरी करण्यासाठी आज त्यांनी शरद पवार यांच्याविरोधात भूमिका घेतली, उद्या ठाकरेंच्य विरोधात भूमिका घेण्यास ते कमी करणार नाही. उबाठाला खड्यात घालण्याची सुपारी संजय राऊत यांनी काँग्रेसकडून घेतली आहे. काँग्रेसकडून खंडणी घेत उबाठाला संपवण्याचे काम राऊत करत आहेत. मविआत एकमत नाही नवनाथ बन म्हणाले की, मविआमध्ये कोणत्याही विषयावर एकमत होत नाही. 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच कोण मुख्यमंत्री होणार यावर त्यांचे एकमत होत नाही. मुळात मविआमध्ये बिघाडी आहे हे पहिल्या दिवसांपासून दिसून येत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बोलण्याचा अधिकार नाही नवनाथ बन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पळ काढणारे नाहीतर देशाचे नेतृत्व करणारे आहेत. पळ काढणारे उद्धव ठाकरे होते त्यांना संधी मिळाली आणि घरी बसून सरकार चालवले ते पळपुटे आहेत म्हणून जनतेने त्यांना नाकारले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 3 वेळा जनतेने निवडून दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनतेशी संवाद कसा साधायचा हे माहिती आहे ते थेट जनतेशी संवाद साधतात. उबाठा गटाचे सरकार असताना कार्टुनसाठी डोळा फोडणाऱ्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बोलू नये. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बोलणाऱ्या संजय राऊत आणि उबाठा गटावर नवनाथ बन यांनी जोरदार हल्ला चढवला. केतकी चितळे, निखिल भामरे आणि पत्रकारांवरील कारवायांचा उल्लेख करत त्यांनी महाविकास आघाडी सरकारने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटल्याचा आरोप केला. राऊतच खरे देशद्रोही नवनाथ बन म्हणाले की, पत्रकार स्वातंत्र्यावर बोलण्यापूर्वी महाविकास आघाडी सरकारच्या काळातील कारवायांची आठवण ठेवावी. तुम्ही पाकिस्तान आणि बांगलादेशधार्जिणी भूमिका घेतात तुम्हीच खरे देशद्रोही आहात. केंद्र किंवा राज्य सरकारने कोणत्याही चुकीच्या गोष्टीचं समर्थन केले नाही.राऊतांचा भारतात, अमेरिकेत किंवा आंतरराष्ट्रीय कोर्टात विश्वास नसेल तर आता अंतराळात कोर्ट शोधावे असा टोलाही बन यांनी लगावला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर