ब्रेकिंग न्यूज
पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video Agniveer-Bharti-2026: भावांनो, लागा तयारीला…! कोल्हापुरात 14 सप्टेंबरपासून अग्निवीर भरती, कुणाला संधी? CRIME : रात्री बायकोसोबत ‘आखाड पार्टी’ केली अन् सकाळी शुद्धीत येताच डोक्यात कुकरचं झाकण घालून संपवलं! शिक्ष… Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम…
SP News Maregaon

दिव्य मराठी विश्लेषण‎:विधानसभेतील पराभवानंतर तनपुरेंची जंगम मालमत्ता 1 कोटीने, कर्ज 22 लाखांनी वाढले, ईडी न्यायालयाने दोषमुक्त केल्याने एकही गुन्हा दाखल नाही

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीकडून (शरद पवार गट) कडून निवडणूक लढवणारे प्राजक्त तनपुरे आता भाजपकडून विधान परिषद लढवत आहेत. सन २०२४ च्या विधानसभेवेळी आणि आता विधान परिषदेसाठी त्यांनी दाखल केलेल्या शपथपत्रातून त्यांच्या वैयक्तिक वार्षिक उत्पन्नात घट दिसून आली. मात्र, दुसरीकडे तनपुरे दाम्पत्याच्या जंगम मालमत्तेत आणि कर्जामध्येही वाढ झाली. त्यांना ईडीकडून क्लीन चिट मिळाली असल्याने त्यांच्यावर आता एकही गुन्हा दाखल नाही. प्राजक्त तनपुरे यांच्या वैयक्तिक वार्षिक उत्पन्नात १० लाख ४० हजार १०० रुपयांची घट झाली. सन २०२४ मध्ये आयकर विवरण पत्रात त्यांचे वार्षिक उत्पन्न ४६ लाख ८ हजार २३० रुपये होते. आता हे उत्पन्न २०२६ मध्ये ३५ लाख ६८ हजार १३० रुपयांवर आले. दुसरीकडे त्यांच्या पत्नी सोनाली यांच्या उत्पन्नात मात्र १९ हजार ५९० रुपयांची वाढ नोंदवली असून ते २१ हजार ५४० रुपयांवरून ४१ हजार १३० रुपये झाले. उत्पन्न घटले तरी दोघांच्याही जंगम मालमत्तेत वाढ आहे. प्राजक्त तनपुरे यांची स्वतःची जंगम मालमत्ता १ कोटी ४ लाख २५ हजार ९४ रुपयांनी वाढून ती आता १ कोटी ३१ लाख ९२ हजार ७७४ रुपयांवरून थेट २ कोटी ३६ लाख १७ हजार ८६९ रुपयांवर पोहोचली आहे. तसेच, त्यांच्या पत्नीच्या जंगम मालमत्तेतही ९ लाख ८३ हजार ५१८ रुपये भर पडली असून ती १ कोटी ६३ लाख ५१ हजार ८०६ रुपयांवरून १ कोटी ७३ लाख ३५ हजार ३२५ रुपये इतकी झाली. तनपुरे दाम्पत्याकडे ११.२५ कोटींच्या जागा प्राजक्त तनपुरे यांच्या नावावर राहुरी येथील ९ एकर २३ गुंठे शेतजमीन, वांबोरी येथील ३०६ चौरस मीटर बिगरशेती जमीन आणि पुण्याच्या लोहगाव येथील एकूण ३५०० चौरस फुटांचे दोन निवासी फ्लॅट्स आहेत. तसेच त्यांच्या पत्नीच्या नावावर धाराशीव येथील ६ एकर ५ गुंठे शेतजमीन आहे. बाजारमूल्य वाढल्याने स्थावर मालमत्तेत ६० लाख रुपयांची वाढ होऊन ती १० कोटी ८२ लाख ५ हजार रुपये झाली आहे. तर त्यांच्या पत्नीची स्थावर मालमत्ता ४३ लाख १८ हजार ५५० रुपये आहे. दोघांकडेही प्रत्येकी १०० ग्रॅम सोने, ८ लाखांनी किंमत वाढली दोघांकडे प्रत्येकी १०० ग्रॅम सोने कायम आहे. बाजारभाव वधारल्यामुळे या सोन्याचे मूल्य प्रत्येकी ४ लाख रुपयांनी वाढून आता ८ लाख रुपयांवरून १२ लाख रुपये झाले आहे. याव्यतिरिक्त पत्नीच्या जडजवाहिर मूल्यात १ लाख ३० हजार रुपयांची वाढ होऊन ते १० लाख रुपये झाले आहे. प्राजक्त टेक्सटाईल, प्रसाद शुगर आणि गोवर्धन मिल्क या कंपन्यांमधील शेअर्स प्राजक्त तनपुरे यांच्याकडे आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर