ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

पर्यावरण संवर्धन रॅली; 150 कापडी पिशव्या:15 रोपांचे वाटप, मान्यवरांच्या हस्ते नियमित कापडी पिशवी वापरणाऱ्या नागरिकांचा “वसुधा विकास पुरस्काराने’विशेष गाैरव‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


“राखण्या निसर्गाचा समतोल माप, झाडे लावा माय बाप’, अशी घोषणा देत “माय वसुधा विकास” संस्थेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिवसानिमित्त पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती रॅली काढण्यात आली. नियमित कापडी पिशवी वापरणाऱ्या नागरिकांना यानिमित्ताने “वसुधा विकास पुरस्काराने” सन्मानित करण्यात आले. रॅलीत १५० कापडी पिशव्या आणि १५ रोपांचे वाटप करण्यात आले. पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या माय वसुधा विकास संस्थेतर्फे वर्षभर विविध उपक्रम राबवण्यात येतात. सर्वप्रथम सातव चौक येथे सर्व सहभागी गोळा झाले. याठिकाणी पर्यावरणाचे महत्व डॉ. मनिषा पालीवाल यांनी पटवून दिले. कार्यक्रमाची सांगता . जयप्रकाश पाटील, यांच्या भाषणाने झाली. . सारंग पुराणिक, श्री. सुधीर देशपांडे, विजय शेलुकर, आर डी देशपांडे, डॉ. छाया देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. आभार डॉ. योगेश पालीवाल यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. दिनकर देशमुख, दिनेश बडगुजर, भरत पटेल, भगवान राणे, माया डाबरे, पौर्णिमा देशमुख, सुषमा गोखले, विजय गोखले, सरिता पटेल, तेजस्विता बडगुजर, अनिता राणे, भावना जोशी, स्वाती कळसकर, निशिता कळसकर, सुनील कांडेकर, संगीता कांडेकर, मीरा गोतरकर, अनिता कवडे, संदीप जोशी,रंजना जोशी, अमोल पाचकवडे, मनीष गावंडे, तुषार पळसकर, अन्वी पळसकर, प्रणिता पळसकर, श्री देशमुख, वैशाली हातवने, कोकिळा पाटील, दीप्ती जोशी, दीपा शुक्ला, छाया देशमुख, कल्पना दळवी, योगेश मोटे, अंगद जोशी, इशिका मोटे, भाग्यश्री पुराणिक, सारंग पुराणिक, किर्ती शर्मा, शारदा डोंगरे यांनी परिश्रम घेतले. पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या माय वसुधा विकास संस्थेतर्फे वर्षभर विविध उपक्रम राबवण्यात येतात. लोकांनी प्लॅस्टिक कॅरी बॅगचा वापर टाळावा, यासाठी निःशुल्क कापडी पिशव्या वाटप केल्या जातात. गत पर्यावरण दिनापासून आजपर्यंत एक वर्षात सुमारे ७ हजार ६०० कापडी पिशव्या संस्थेतर्फे निःशुल्क वितरीत करण्यात आल्या. गत १५ वर्षात तर एकूण ४३ हजार ६०० कापडी पिशव्या वाटत करण्यात आल्याचे संस्थेच्या अध्यक्षा डॉ. मनीषा पालीवाल यांनी सांगितले. नागरिकांना कापडी पिशवी देण्यात आली. तसेच जे लोक नेहमी कापडी पिशवीचा वापर करतात त्यांना , सुजान नागरिक म्हणून स्व. हरगोविंद पालीवाल स्मृती, “वसुधा विकास पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले. यासाठी ५ जणांची निवड करण्यात आली. सिंगल युज प्लॅस्टिक न वापरण्याची शपथ घेतली.रॅलीत श्री संकल्प मित्र परिवार, जिव्हाळा प्रतिष्ठान, पुनः कृती सोल्युशन, कृष्णार्पण प्रतिष्ठान यांनीही सहभाग नोंदवला. दीड दशकात ४३ हजार कापडी पिशवांचे वितरण सर्वधनासाठी आवाहन ‘ घोषणा देत पर्यावरण संवर्धनासाठी आवाहन करण्यात आले. ज्येष्ठ सदस्य जयप्रकाश पाटील आणि सर्वात कमी वयाचा ६ वर्षांचा समर्थ गोतरकर यांनी हिरवी झेंडी दाखवून फेरी ला सिग्नल दिला. रॅली सातव चौक ते जठार पेठ चौक भागात सकाळी ८ ते ९ दरम्यान आणि सायंकाळी ६ ते ७ दरम्यान तुकाराम चौक ते कौलखेड रोड परिसरात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्लॅस्टिक निर्मूलन जनजागृती, वृक्ष संस्कार अभियान अंतर्गत वृक्षारोपण व संवर्धन जनजागृती आणि प्लास्टिक डिस्पोजेबल मुक्त महाराष्ट्र अभियान अंतर्गत प्रचार व प्रसार फेरी (रॅली) काढण्यात आली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर