ब्रेकिंग न्यूज
⚡ Solapur: लग्न करतो म्हणाला, अल्पवयीन मुलीला घरातून पळवलं अन् नको तेच केलं, आरोपीला मोठी शिक्षा ✦ ⚡ पुणे : ज्येष्ठ महिला घरात एकटीच; ‘ती’ आली, मालिश करण्याच्या बहाण्यानं घरात प्रवेश अन् काहीच मिनिटात घडलं का… ✦ ⚡ मिठाई खायला दिली, डोळ्यावर पट्टी बांधली; सहावीत शिकणाऱ्या पुतणीसोबत… चुलत्याच्या कृत्यानं कोल्हापुरात संत… ✦ ⚡ मिठाई खायला दिली, डोळ्यावर पट्टी बांधली; सहावीत शिकणाऱ्या पुतणीसोबत… चुलत्याच्या कृत्यानं कोल्हापुरात संत… ✦ ⚡ तीन महिने इस्त्रीच्या दुकानात काम, सिग्नल मिळताच गोळीबार, राजेंद्र भिंगे खून प्रकरणात शॉकिंग खुलासा, पंढरपु… ✦ ⚡ तीन महिने इस्त्रीच्या दुकानात काम, सिग्नल मिळताच गोळीबार, राजेंद्र भिंगे खून प्रकरणात शॉकिंग खुलासा, पंढरपु… ✦ ⚡ तो वाघाकडे अन् वाघ त्याच्याकडे पाहतोय, दुचाकीस्वार आणि वाघ समोरासमोर, श्वास रोखून धरायला लावणारा Video ✦ ⚡ Pune News: दीर अन् सासूच निघाले ‘व्हिलन’; आधी पतीचं निधन, आता शिक्षिकेला लेकीच्या वाढदिवसादिवशी संपवलं, पुण… ✦ ⚡ रेल्वेत सावज हेरायची, प्रसाद म्हणून चिक्की द्यायची अन्… महिलेचं कांड पाहून सगळ्यांना धक्का, सोलापुरात मोठ… ✦ ⚡ मारेगाव–यवतमाळ महामार्गावर अज्ञात वाहनाची रोह्याला धडक!
SP News Maregaon

हितेंद्र ठाकूर यांची भेट न घेताच एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना!:बविआ आणि शिवसेना शिंदे गटाच्या विलीनीकरणाच्या चर्चेला तूर्तास पूर्णविराम

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


विधानपरिषद निवडणुकांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांना पक्ष विलिनीकरणाचा प्रस्ताव देण्यात आला होता, ज्यानंतर कडू यांनी शिवसेनेत प्रवेश करत विधानपरिषदेची आमदारकी मिळवली होती. त्याच धर्तीवर आता पुन्हा एकदा विधानपरिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना, पालघरमधील नेते आणि बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांनाही शिंदेंकडून पक्ष विलिनीकरणाची ऑफर देण्यात आल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होती. या विलिनीकरणाच्या बदल्यात हितेंद्र ठाकूर यांना विधानपरिषदेवर संधी दिली जाणार असल्याचे बोलले जात होते, मात्र अखेर ही बोलणी फिस्कटली असून विलिनीकरणाच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे आणि दुसरीकडे या घडामोडींनंतर ठाणे मतदारसंघातून विधानपरिषदेसाठी रवींद्र फाटक यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. हितेंद्र ठाकूर यांना न भेटताच एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची आज एक महत्त्वपूर्ण भेट होणार होती. या भेटीदरम्यान पक्ष विलिनीकरण आणि विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, हितेंद्र ठाकूर यांची कोणतीही भेट न घेताच एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झाल्याने या सर्व राजकीय चर्चांना तूर्तास पूर्णविराम मिळाला आहे. दुसरीकडे, एकनाथ शिंदे दिल्लीला जाण्यापूर्वी माजी आमदार रवींद्र फाटक यांनी नंदनवन बंगल्यावर जाऊन त्यांची आणि त्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांचीही भेट घेतली. या भेटींमध्ये ठाणे-पालघर विधान परिषद निवडणुकीच्या संदर्भात सविस्तर चर्चा झाल्याचे समजते. या ताज्या घडामोडींमुळे आता या निवडणुकीत शिवसेनेकडून रवींद्र फाटक हेच उमेदवार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. तसेच, बहुजन विकास आघाडीच्या विलिनीकरणाचा कोणताही प्रस्ताव नाही आणि तशी कोणतीही चर्चा झाली नसल्याची स्पष्ट माहिती समोर येत आहे. रवींद्र फाटक यांनी घेतली हितेंद्र ठाकूर यांची भेट दरम्यान, माजी आमदार रवींद्र फाटक हे स्वतः विधान परिषद निवडणूक लढवण्यासाठी अत्यंत इच्छुक असून, त्यांनी नुकतीच वसईत जाऊन बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांची प्रत्यक्ष भेट घेतल्याने या निवडणुकीत मोठा राजकीय ट्विस्ट निर्माण झाला आहे. या महत्त्वपूर्ण भेटीनंतर वसई-विरारमधील बहुजन विकास आघाडीचा संपूर्ण पाठिंबा शिवसेनेला मिळण्याची शक्यता अधिक बळकट झाली असून, आगामी काळात मतांची गोळाबेरीज वाढवण्यासाठी आणि ठाणे परिसरावर आपले वर्चस्व अबाधित राखण्यासाठी शिवसेनेने ही मोठी खेळी खेळल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विलीनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम दरम्यान, बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर हे अचानक आपल्या खासगी गाडीने ठाण्याच्या दिशेने रवाना झाल्यामुळे अनेक राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले होते. ते एखाद्या वैयक्तिक भेटीसाठी जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असली तरी, सध्याच्या राजकीय वातावरणात ते ठाण्यात नेमकी कोणाची आणि कोणती मोठी राजकीय भेट घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. प्रहार संघटनेच्या विलीनीकरणानंतर आता पक्षाच्या विस्तारासाठी एकनाथ शिंदे यांनी बहुजन विकास आघाडीला दिलेल्या विलीनीकरणाच्या प्रस्तावाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होती, मात्र आता या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर